Parola

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, अज्ञात इसमाने विरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फोटो कैद

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, अज्ञात इसमाने विरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फोटो कैद

पारोळा : पारोळा शहरातील गुजराती गल्ली येथे असलेल्या जळगाव पीपल्स बँकेचे एटीएम एका अज्ञात इसमाने फोडण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न फसले व त्याचा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली म्हणून या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पारोळा शहरातील गुजराती गल्लीतील जळगाव पीपल्स को ऑफ बँक या शाखेचा शिपाई दि 16 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी बँक उघडण्यास गेला असता बँकेचे एटीएमचे लोखंडी शटर वाकलेले आढळून आले व एटीएम चे नुकसान झालेले दिसले याबाबत त्यांनी लगेच शाखा व्यवस्थापक त्रिगुण आराध्य यांच्याशी संवाद साधला यावरून त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलवले प्रकरणी चौकशी केली असता दरवाजा तुटलेला होता व मशीन जागेवरून हरवली होती या प्रकरणी बँकेचा सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेक केले असता रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी कोणीतरी एक अज्ञात इसम हातात लोखंडी पाना घेऊन तोंडाला रुमाल बांधून बँकेचे एटीएम फोडण्याचा इराद्याने आला होता परंतु त्याचा हा डाव फसला एटीएम फुटले नाही आणि तो बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला याबाबत शाखा व्यवस्थापक त्रिगुण मनोहर यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात इसमाने युद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button