Jalgaon

कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांना देणार नाही ! : जिल्हाधिकारी राऊत

कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांना देणार नाही ! : जिल्हाधिकारी राऊत

रजनीकांत पाटील

जळगाव :- कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी घेतली दक्षता – जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की दुर्दैवाने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. तो संबंधित महापालिका, पालिकेच्या यंत्रणेला देऊन थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. नातेवाइकांनी तेथे कमीत कमी संख्येने यावे. पालिकेचे कर्मचारी योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करतील. “कोरोना’चा प्रसार होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातून “कोरोना’ला हद्दपार करण्यासाठी तीन प्रकारची तपासणी सुरू झाली आहे. यात कोरोना “पॉझिटिव्ह’ रुग्ण वाढतील, मात्र नागरिकांनी पॅनिक होऊ नये. जेवढे अधिक पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीसाठी येतील तेवढे ते लवकर बरे होतील. पॉझिटिव्ह रुग्ण लवकर बरे व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा प्रयत्नात आहे, असे सांगताना यापुढे कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही, त्याच्यावर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच अंत्यसंस्कार करतील, अशा सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button