Nashik

देशातील 9 करोड पेक्षाही जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एका क्लिकवर एकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा – खा. डॉ.भारती पवार

देशातील 9 करोड पेक्षाही जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एका क्लिकवर एकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा – खा. डॉ.भारती पवार

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहत तसेच सुशासन दिनानिमित्त देश भरात ठिकठिकाणी कृषी संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून मोहाडी तालुका दिंडोरी येथे आयोजित कृषी संवाद कार्यक्रमात खा. डॉ.भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नवीन कृषी कायद्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे आयोजित कृषी संवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांचे शेतकऱ्यांशी थेट संबोधन मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले. शुक्रवार दि.25 डिसेंबर रोजी गीता जयंतीचे औचित्य साधत वारकऱ्यांना खा.डॉ.भारती पवार यांचे हस्ते गीता वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधत विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असून कृषी कायद्या संदर्भात काही शंका व अडचणी असल्यास आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले. शेतकरी वर्ग हा कृषी बिलाच्या विरोधात नसून उलटपक्षी त्यांचे ह्या सुधारित कृषी बिलाला समर्थनच असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले . या प्रसंगी दिंडोरी लोकसभा लोकप्रिय खासदार मा. डॉ. भारती पवार, आ.देवयानी फरांदे, आ.राहुल आहेर, श्री.केदा नाना आहेर नाशिक जिल्हा अध्यक्ष, श्री. बापूसाहेब पाटील प्रदेश सचिव किसान मोर्चा भाजपा, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सारिका डेर्ले, श्री. नरेंद्रजी जाधव अध्यक्ष दिंडोरी तालुका, श्री. भागवतबाबा बोरस्ते तालुका अध्यक्ष निफाड , श्री. सतीशजी मोरे भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस, श्री.सचिन दराडे युवा मोर्चा अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष श्री.प्रमोदशेट देशमुख, श्री.शाम बोडके , श्री.तुषार वाघमारे, श्री.शाम मुरकुटे योगेश तिडके, श्री.निलेश गायकवाड भास्कर कराटे , श्री.बापू बोंबले, श्री. दिलीप बोरस्ते, डॉ.उमेश काळे, श्री.तुकाराम जोंधळे , श्री.योगेश चौधरी कुंदन जावरे, श्री.बाळासाहेव देशमुख, भाजपा सोशल मीडिया नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक, श्री.अमर राजे भाजपा युवा मोर्चा दिंडोरी तालुका अध्यक्ष, श्री.नितीन जाधव भाजपा विस्तारक, श्री.योगेश तिडके सरचिटणीस भाजपा दिंडोरी तालुका, श्री.काका वडजे, श्री.प्रशांत गोसावी, श्री. कैलास गाढवे, श्री.कुंदन जावरे, श्री.सुखदेव पाटील , श्री.कारभारी पिंगळ, श्री. भिका शिंदे, श्री.नारायण जाधव, श्री. त्रंबक पिंगळ , श्री.गुलाब पिंगळ भाजपा मान्यवर कार्यकर्ते आणि उपस्थित मान्यवर शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
——————————-
फोटो कॅप्शन : गीता जयंती निमित्त वारकऱ्यांना भगवत गीता प्रदान करताना खा. डॉ.भारती पवार

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button