चक्क पंढरपूर तहसील कार्यालयात कोरोनो ची घुसखोरी
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पंढरपूर तहसील कार्यालय मधील सर्व कर्मचाऱ्यांची व स्टॅम्प विक्रेत्यांची कोरोन रॅपिड टेस्ट करून घेण्याची गरज भासत आहे.
तरी तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवावे अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे व कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचे कोरोन रॅपिड टेस्ट करून घेणे असे नागरिकांमधून चर्चेला उधान आल्याचे दिसून येत आहे पंढरपूर तहसील कार्यालय येथे कर्मचाऱ्यांनी व स्टॅम्प विक्रेत्यांनी गर्दी न करता आपले कामकाज करावे व वेळोवेळी सॅनिटायझर मास्क व सोशल डिस्टंसिंग चा वापर करावा आपल्या तहसील कार्यालय मधील दोन निगेटिव्ह तर दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहे असे गुप्त माहिती मिळताच पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारातील नागरिकांमध्ये चर्चा ही दिसून आली आहे.






