विठ्ठलाच्या चेअरमन पदी युवराज दादा पाटील यांची बिनविरोध निवड करा माऊली हळणवर
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी युवराज पाटील यांची सर्व संचालक मंडळांनी बिनविरोध निवड करावी गेल्या चार पाच वर्षापासून कारखान्याच्या प्रशासनाने कारखान्याच्या या कामगारांच्या पगारी दिलेल्या नाहीत शेतकऱ्यांची व वाहतूकदारांची बिले थकलेले आहेत कै औदुंबर आण्णा पाटील यांनी या कारखान्याच्या चिमणी मधून सोन्याचा धूर निघेल असे काम केले होते पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सभासदांना समृद्धी आणली होती तेच वैभव प्राप्त करण्यासाठी औदुंबर अण्णांच्या विचाराचा वारसदार रक्ताचा वारसदार प्रामाणिकपणे काम करणारा नेता म्हणून युवराज पाटील यांच्याकडे पाहिलं जातं तालुक्यातील विठ्ठल परिवारातील शेतकऱ्यांमधून हीच कुजबूज ऐकायला मिळत आहे सरकार दरबारी ही युवराज पाटलांच वजन चांगल्या प्रकारे आहे शरदचंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब यांच्याशी त्यां चे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे कारखान्याच्या अडचणी सरकारकडे मांडून त्या सोडवून घेण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे तालुक्यातील अनेक ज्येष्ठ सभासद यांच्या मधून युवराज दादा च्या नावाला हिरवा कंदील दाखवला जात आहे संचालक मंडळाला मी एक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद म्हणून विनंती करीत आहे या आपण युवराज पाटील यांना बिनविरोध चेअरमन पदी निवड करावी व कारखान्याला शेतकऱ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी युवराज पाटील नक्की यशस्वी होतील असा आम्हाला विश्वास आहे






