? जळगाव Live.. कोरोना Update… आज 979 रुग्ण कोरोना बाधित तर अमळनेर येथे 16 तर चोपड्यात सेंच्युरी..!
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात आज दिवसभरात 979 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. आज 667 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 61602 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 7581 अॅक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे.बाधितांची संख्या 70627 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज
दिवसभरात सहा बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1444 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर अमळनेर येथे 16 रुग्ण आढळून आले आहेत. आता सध्या 155 रुग्ण उपचार घेत असून आज 10 रुग्ण बरे झाले आहेत. चोपडा शहरात झपाट्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज 101 रुग्ण आढळून आले आहेत.80 रुग्ण बरे झाले असून 876 रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.







