वनपरिक्षेत्र कार्यालय पंढरपूर येथे 72वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय पंढरपूर येथे ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने जगातील सर्वात मोठी व आदर्श राज्यघटना तयार करुन या देशातील सबंध भारतीयांना स्वातंत्र्यात जगण्याचे हक्क दिले. या भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीत अध्यक्ष म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तर सदस्य म्हणुन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन.गोपालस्वामी अय्यंगार, कन्हैयालाल मुनशी, बी.एल.मित्तल, डि.पी.खेतान सय्यद मोहम्मद असे एकूण ७ जणांचे मोलाचे योगदान लाभले. या सर्वांच्या योगदानाने भारताला २६ जानेवारी १९४९ साली संविधान प्राप्त झाले.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री व्ही एन पवळे वन परिक्षेत्र अधिकारी पंढरपूर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजवंदन करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले.
सर्व कार्यक्रम सुकर पार पाडण्याकरीता पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व वनकर्मचारी व ऑफिस कर्मचारी उपस्थित होते व मोलाचे योगदान लाभले.






