Ausa

लामजना येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी

लामजना येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा :- औसा तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या लामजना (माळ्याचा मळा,जुने लामजना गाव) येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.लामजना आणि परिसरातील भजनी मंडळ व महिला भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माळकोंडजी येथील ह.भ.प.बोंडगे महाराज यांचे काल्याचे कीर्तन पार पडले.त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला लामजना, तपसे चिंचोली, माळकोंडजी,नागरसोगा, उत्का ,गोटेवाडी, तांबरवाडी, हारेगाव,तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातीलही वारकऱ्यांनी हजेरी लावली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button