Nashik

गॅस सिलेंडरच्या स्फोटात आठ जण होरपळले जुन्या नाशिकमधील घटना

गॅस सिलेंडरच्या स्फोटात आठ जण होरपळले जुन्या नाशिकमधील घटना

जुने नाशिक : नाशिकमधील इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नं ७ मध्ये शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यात घरातील सात आणि शेजारील एक असे एकूण आठजण गंभीररित्या आगीत होरपळले. आगीत होरपळलेल्या आठही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर यातील ४ जणांनी प्रकृती गंभीर आहे.
या घटनेत जखमी झालेल्यांची नावे सय्यद लियाकत रहीम (वय ३२), सय्यद नुसरद रहीम (वय २५), रमजान वलिऊल्ला अन्सारी (वय २२), सोहेब वलिऊल्ला अन्सारी (वय २८), आरीफ सलिम अत्तार (वय ५३), नसरीन नुसरद सय्यद (वय २५), सईदा शरफोद्दीन सय्यद (वय ४९), मुस्कान वलिऊल्ला सय्यद (वय २५) अशी आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, जुन्या नाशकातील इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नंबर ७ मध्ये रहीम सय्यद यांचे कुटूंबीय भाड्याने राहते. शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घरातील गॅस संपल्याने बाहेरून एका नातेवाईकाने गॅस सिलिंडर आणून दिला. गॅस सिलिंडर बदलत असताना सिलिंडरमधील गॅस गळती सुरु झाली. क्षणार्धात हा गॅस संपुर्ण फ्लॅटमध्ये पसरला आणि अचानकपणे स्फोट झाला. या स्फोटोत रहीम सय्यद यांच्या कुंटूबातील सात आणि शेजारील एक असे आठजण गंभीर जखमी झाले. तर यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
या स्फोटोच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. यानंतर शेजाऱ्यांनी या स्फोटोतील जखमींना भाजीपाल्याचा एका टेम्पोतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका बंबाच्या साहयाने फ्लॅटमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. याशिवाय घटनेच्या ठिकाणी दोन-तीन रिकामे गॅस सिलेंडर मिळून आल्याने कोणत्या गॅस सिलिंडरमधून स्फोट झाला. याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ कुमुकासह पोलिस उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जुनेद शेख, इतर विभागातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी देत पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button