Amalner

Amalner: मुंदडा नगर मधील महिला धडकल्या नगरपरिषदेत.. मुख्याधिकाऱ्यांसमोर ठेवला स्वच्छतेचा प्रश्न..

Amalner: मुंदडा नगर मधील महिला धडकल्या नगरपरिषदेत.. मुख्याधिकाऱ्यांसमोर ठेवला स्वच्छतेचा प्रश्न..

अमळनेर (प्रतिनिधी) रस्ते, गटारी आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्येला कंटाळून शहरातील मुदंडा नगर (1) या भागातील महिलांनी थेट नगरपालिकेत धडक दिली. संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले. तसेच महिलांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरातील समस्या सांगण्यात आल्या.पालिकेचा नियमित कर भरणा करीत असूनही पालिकेच्या सोयी सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. प्रामुख्याने या भागातील रस्ते नादुरुस्त असल्याने व गटारी नसल्याने कॉलनी वासियांची येता-जाताना सांडपाण्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होते, गटारी नसल्याने अनेक ठिकाणी पाणी उघड्यावर साचत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी डबके सांचून अनेक लहान-मोठे अपघात होत आहे,अनेक नागरिकांना पडल्यामुळे दुखापत ही झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढून आता पावसाळ्यात तर या भागाचे अतिशयकठीण हाल झाले असून पूर्ण रस्ता नादुरुस्त असल्याने त्यावर चिखल व पाणी माखून घराबाहेर निघणेच कठीण झाले आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी पालिकेने खुल्या भूखंडात उद्यानाचे निर्माण केले असून याठिकाणी पालिकेकडून नियमित स्वच्छता न राखली गेल्याने झाडे झुडपे वाढून सर्वत्र प्रचंड घाण झाली आहे. परिसरात विषारी सर्पांचा वावर वाढून अनेकदा सर्प रस्त्यावर तसेच घरात प्रवेश करतात, या सर्पा मुळे परिसरातील सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, या भीती पोटी सांयकाळी नागरिक घराबाहेर सुद्धा निघत नाही, एखादया वेळी लहान मूल येता जाताना सर्पामुळे काही विपरित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.
मुख्याधिकारी यांनी स्वतः परिसरात फेरफटका करून डोळ्यांनी पाहावे आमचे होणारे हाल प्रत्यक्ष डोळ्यानी बघावे व वरिल समस्यापासून आम्हाला मुक्त करावे अशी आग्रही मागणी वजा विनंती यात करण्यात आली आहे. निवेदन देताना संत यावेळी गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या जळगाव जिल्हाध्यक्षा वैशाली शेवाळे,
परिषदेच्या तालुकाध्यक्ष वर्षा पाटील, मनीषा महाजन, ललिता चौधरी, वर्षा पाटील, शिवाजी पाटील, निलेश पगारे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button