Jalgaon

? Crime Diary..’आश्रम ‘ ची कहाणी जामनेरमध्ये प्रत्यक्षात !अश्लील व्हिडिओ बनवून जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न,अली बाबासह 4 जणांविरुद्ध FIR दाखल

? Crime Diary..’आश्रम ‘ ची कहाणी जामनेरमध्ये प्रत्यक्षात !अश्लील व्हिडिओ बनवून जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न,अली बाबासह 4 जणांविरुद्ध FIR दाखल

जळगाव : सध्या देशभरात गाजलेल्या आश्रम या वेबसिरीजसारखीच घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. एका मौलवी बाबाने एका महिलेचा अश्लिल व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन या महिलेचे धर्मांतर करुन तिच्याबरोबर लग्न केले. बाबाच्या या कृत्याची आपबिती या महिलेने सोशल मिडियावर मांडली. त्यानंतर जामनेर पोलिसांनी त्याची दखल घेऊन बाबासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अल्ताफ मोहसिन ऊर्फ अलीबाबा (रा. नेरी दिगर, ता़ जामनेर) असे या बाबाचे नाव आहे. त्याच्यासह ताहेर रिहासत शेख, सोहेल अन्सारी (सर्व रा. मालेगाव) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, या महिलेला एकाने २०१७ मध्ये अलिबाबा याचा मोबाईल नंबर दिला होता.
तुमच्या कुटुंबातील कलह मिटवून देतो, असे सांगून अलीबाबाने तिच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्याला तिने होकार दिल्यावर अलीबाबा मालेगाव येथून नेरी येथील आश्रमात आला. त्याने या महिलेला संमोहित केले. दुसर्‍या दिवशी ही महिला शुद्धीवर आली.

तेव्हा बाबाने तिला तिचा अश्लिल व्हिडिओ दाखविला. त्यानंतर तिला धमकी देण्यास सुरुवात केली. तिचे धर्मांतर करुन लग्नही लावले. हे करताना त्याने आपल्याला पत्नी व मुलगा असल्याचे तिच्यापासून लपविले.

त्यानंतरही त्याने वेळोवेळी धमकी देत तिच्याकडून अडीच लाख रुपये उकळले. त्यानंतर ती त्याचे घर सोडून माहेरी आल्या. तिने पोलिसांकडे तक्रार करु नये म्हणून बाबाने तिच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका महिलेने तिला धमकी दिली. त्यानंतर आता या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक मालेगावला रवाना झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button