AmalnerMaharashtra

?️ शासनाच्या आदेशाचे अमळनेर नगरपरिषद कडून उल्लंघन…26 मार्चचे शासनाचे दिव्यांगांना आरोग्य किट देण्याचे आदेश…

?️ शासनाच्या आदेशाचे अमळनेर नगरपरिषद कडून उल्लंघन…26 मार्च चे शासनाचे दिव्यांगांना आरोग्य किट देण्याचे आदेश…नगरपरिषद अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून टाळाटाळकोरोना पार्श्वभूमीवर दिव्यांगांना आरोग्य किट तात्काळ उपलब्ध व्हावे अमळनेर नगरपरिषद यांना प्रहार अपंग क्रांती संघटने तर्फे निवेदनप्रतिनिधी: नूर खानकोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाकडून योग्य ती पाऊल वेळीच उचलली गेली आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या कडून लेखी आदेश दि 26 मार्चच्या पत्रानुसार सर्व जिल्ह्यातील दिव्यांग निगडित विभागास पत्र पाठविले आहे.तरी देखील अमळनेर नगरपरिषद कार्यालय यांच्या कडून दिव्यांगांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली किट देण्यास अमळनेर नगरपरिषद असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.अमळनेर शहरात एकूण दिव्यांग संख्या किती याचा देखील आकडा नगरपरिषद यांच्या कडे नसून दिव्यांग बांधवांची युमिनिटी ही खूप कमी असल्याने त्यांना लवकर संसर्ग होऊ शकतो. या दृष्टिकोनातून दिव्यांग बांधवांकडे अमळनेर नगरपरिषद आणि लोक प्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. आरोग्या च्या बाबतीत मात्र दिव्यांग बांधवांकडून नाराजगी व्यक्त होत आहे.?️ शासनाच्या आदेशाचे अमळनेर नगरपरिषद कडून उल्लंघन...26 मार्चचे शासनाचे दिव्यांगांना आरोग्य किट देण्याचे आदेश...कोरोना विषाणू पासून सावधगिरी बाळगावी व दिव्यांग बांधवांना आरोग्य किट हे तात्काळ उपलब्ध व्हावे या साठी प्रहार अपंग क्रांती संघटना अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांची तीन दिवसांपासून अनुपस्थिती असल्याने उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या दालनात सोशल डिस्टसिंग पाळत बैठक घेण्यात आली यात प्रामुख्याने जे दिव्यांग बांधव हालचाल नाही करू शकत अश्या दिव्यांग बांधवांना आरोग्य किट चे वितरण हे घरपोच करण्यात यावे या साठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी योगेश पवार प्रहार संघटना शहराध्यक्ष , प्रा.जयश्री साळुंखे सामाजिक कार्यकर्त्या,नूर खान पठाण उपाध्यक्ष , प्रविण पाटील अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, अमळनेर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button