Ausa

गाडवेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

गाडवेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

औसा /लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
कोरोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या ही वाढतच आहे.
कोरोना महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताची कमतरता असल्याची जाणीव ठेवून गाडवे वाडी येथील तरुणांनी अर्पण ब्लड बँकेच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देत २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.दिनांक ३१ मे २०२० रोजी अर्पण ब्लड बँकेच्या वतीने एकदिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना रोगाच्या सुरक्षा राखण्यासाठी काटेकोरपणेनियमांचे पालन करीत गाडवे वाडी येथील रक्तदात्यांनी सुरक्षित अंतर ठेवून रक्तदान केले.
या शिबिरात अर्पण ब्लड बॅंकेने रक्तसंकलन केले असून या कामी
जनसंपर्क अधिकारी , बालाजी जाधव, बालाजी नरहरे, मंदाकिनी महापुरे, संजीवनी वजीरे आदींनी काम पाहिले.
यावेळी गावातील शिवशंकर गाडवे, सुनिल गाडवे, शिवराज पाटील, विकास भारती, अविनाश गाडवे, सिद्धेश्वर खरोसे, दौलत बोमने, आदींनी
परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button