Chimur

? सागवान तस्करील उधाण.. चोरटे मोकाट.. भिसी उपवनक्षेत्रात सागवान झाडांची पुन्हा कत्तल…

सागवान तस्करील उधाण.. चोरटे मोकाट.. भिसी उपवनक्षेत्रात सागवान झाडांची पुन्हा कत्तल…
अधिकाऱ्याचाच हाथ असल्याची शक्यता…
शेतच कुंपन खात आहे?

चिमूर प्रतिनिधी —ज्ञानेश्वर जुमनाके

चिमुर:–
भिसी येथील अप्पर तालुक्यात लाकडाऊनच्या काळात अवैधरित्या धंदा करणाऱ्या सागवान चोरट्यांनी डोके वर काढलेले आहे. दिवसागणिक एकापाठोपाठ पंधरवड्यात सहा वेळा वनविभागाने अवैधरित्या कत्तल झालेले सागवान जप्त केलेले आहे. अंदाजे किमान ५० लाखांचे सागवान जप्त केलेले आहे. परंतू शासकीय आकडेवारीत १४ लाख ३२ हजार ७८७ रूपयांचे ३४.२९३ घनमिटर लाकूड जप्तीनाम्यात दाखविण्यात आले.
सोमवारला रात्रौ भिसी ते शिरसपुर मार्गावरील बंडू कामडी यांच्या शेतात अवैधरित्या कत्तल केलेले सागवान जप्त करण्यात आले. ०.९६२ घनमिटर ७० हजाराचे सागवान आहे. भिसी – शिरसपुर मार्गावरील बंडू कामडी यांच्या शेतात अवैधरित्या सागवानचा साठा असल्याची चर्चा गावात होती . गुप्त माहीतीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिका ऱ्यांंना माहिती मीळताच भिसी येथील क्षेत्र साहाय्यक दोडके खडबडून जागे झाले. कारण आतापर्यंत त्यांच्याच कार्यक्षेत्रात ५ वेळा अवैध कटाईचा सागवान जप्त करण्यात आला होता. क्षेत्र साहाय्यक दोडके आणि वनकर्मचार्यांनी सोमवारी रात्रौला धावपळ करून सागवान जप्त केले. आतापर्यंत ६ वेळा वनविभागाने अवैधरित्या सागवानचा साठा जप्त केला. परंतू येथील क्षेत्र साहाय्यकाला आणी वन कर्मचाऱ्यांना मात्र अवैध सागवान कत्तल चोर सापडलेला नाही. थातुरमातुर कारवाही करून वनविभागाच्या अशा कुंभकर्णी झोपेमुळे सागवान तस्कर निर्ढावलेले आहे. तरी संबंधित वनविभागाचे अधिकारी आणी वनकर्मचाऱ्यांंची चौकशी करून सागवान चोर शोधून काढावे, शेतच कुंपन खात असेल तर न्याय मागायचा कुणाला अशी चर्चा होत आहे.
◆पर्यावरण प्रेमी लक्ष देतील का?
भिसी परिसरात करोडो रूपयांचे सागवान कत्तल प्रकरण होत आहे. शासनाच्या ताब्यातील असणाऱ्या शासकीय जागेवरील सागवान दिवसाढवळ्या चोरीला जात आहे. शासनाचे संम्बधीत अधिकारी धूतराष्ट्राच्या भुमीकेत आहे. अशावेळेस जंगल वाचवा , निसर्ग वाचवा,व्रूक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे , म्हणून जनजागृती केली जाते.
धार्मिक सण , उत्सवात पर्यावरण प्रेमी जनजागृती करून पर्यावरण बचाव चे सादरीकरण करीत असतात मग अशावेळी पर्यावरण प्रेमीनीं लक्ष देणे काळाची गरज आहे. अजून पर्यत कुठल्याही सागवान चोरत्याच वन विभागाने पत्ता लागला नाही भिसी क्षेत्रात लोकं मध्ये चरच्या सुरू आहे की वनविभागा अधिकारी कर्मचारी मिळाले असल्याने कुठल्याही प्रकारची या सागवान तस्करी करणाऱयावर कारवाही होत नसून फक्त कारवाही केल्या चे दाखवत आहेत आज लॉक डाऊन सुरू झाल्या पासून 6ते7 वेळा अवेयध्य सागवान झाडे तोडल्या जात आहेत पण याला कुठल्याही प्रकारे आडा बसला नाही अजून किती सागवान झाडाची कत्तल होईल हे पाहणे गरजेचे आहे? माहे 2019 ते 2020 मध्ये किती ठेकेदार लोकानी सागवान झाडे खसरा तोडण्या करिता परवानगी मागितली व कोणत्या शेतकऱ्या च ते सांगावंसं खसरा आहे हि माहिती प्रकाशित करून खरोखरच त्यांनी वनविभागाने दिलेल्या नंबर प्रमाणे त्याच झाडाची कटाई केली की त्या पेक्षा अधिक झाडांची कटाई केली आहे याची पाहणी करून बिट क्रमांक का प्रमाने सागवान खसरा तोडण्यात आलेका हे सुद्धा वन विभागाने बघणे गरजेचे आहे। या सागवान तस्करी मध्ये मोठे अधिकारी आहेत काय मिळून कि नाही अजून कडले नाही फक्त भिसी येथील वनविभागा कर्मचारी यांना करणे दाखवा असे पत्र देण्यात आले आहे पण या मध्ये निसपक्ष कारवाही होणार की फक्त कागदी घोडे रंगवून तपास ठप्प पाडण्याच काम वनविभाग करीत आहे हे बघणे गरजेचे आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button