शासकीय, निमशासकीय भरती प्रक्रियेत होत असलेल्या गैरकारभाराची CBI चौकशी करा- प्रा. नितीन घोपे, व मासूचे अभिजीत रंधे, रोहन महाजन यांची मागणी.
रजनीकांत पाटील
जळगाव : शिक्षण क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक तसेच इतर सर्व शासकीय / निमशासकीय विभागातील भरती प्रक्रियेत होत असलेल्या गैरकारभारची गुन्हे अन्वेषण विभागा (CBI) कडून चौकशी करुन संपूर्ण भरती प्रक्रिया गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त विश्वासू यंत्रणेमार्फत राबविण्याबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यात महाराष्ट्रातील सर्व विद्याशाखेतील (कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, समाजकार्य, कायदा शास्त्र) पदविका, पदवी, पदव्युत्तर, डी.टी. एड, बी. एड., बी. पी. एड, एम. एड., एम. पी. एड., एम. फिल.,नेट, सेट आणि पीएचडी पात्रता धारक बेरोजगार यांच्या सर्व संघटना आणि विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (कनिष्ठ व वरिष्ठ), अनुदानित महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तासिका, कंत्राटी, Ad-hoc, अतिथी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन इत्यादी संघटना यात सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनात सहभागी सर्व संघटनांनी शासनाकडे आणि तत्सम विभागाकडे निवेदना मार्फत केलेल्या मागण्यांकडे मा. मुख्यमंत्री महोदय यांनी गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी नम्र विनंती या निवेदनातून शासनाकडे करण्यात आली आहे. त्या बरोबरच या निवेदनात शासनाला ईशारा देण्यात आला आहे कि जर या निवेदनावर कोणत्याही स्वरूपाची सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर आम्ही संवैधानिक मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी सुचना शासनाला निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
ईत्यादिंच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन प्रा.नितीन घोपे, प्रा.प्रवीण वाडे,
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) चे जळगाव विभाग प्रमुख अँड.अभिजीत रंधे,
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) चे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन ईत्यादींचे शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिले.






