Amalner: ग्रामपंचायत डांगर बु तर्फे मेरी मिट्टी मेरा देश आणि हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन…माजी सैनिकांच्या परिवारांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
अमळनेर देशात सर्व शासकीय तसेच निम शासकीय कार्यालयांमध्ये तसेच शाळा महाविद्यालय येथे “मेरी मिट्टी मेरा देश ” आंणि “हर घर झेंडा” या उपक्रमांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायत डांगर बुद्रुक या गावात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आझादी का अमृत महोत्सव वर्ष २०२३ चा समारोप निमित्त “मेरी मिट्टी मेरा देश अभियान”, “मिट्टी को नमन, विरो को वंदन” अशा स्लोगन द्वारे जनजागृती रॅली गावात काढण्यात आली होती .या वेळी शहिदांच्या आठवणी साठी शिळा फलकाचे अनावरण करण्यात आले, वसुधरा वंदन म्हणून वृक्षरोपण करण्यात आले,स्वतंत्र सैनिक व वीरांना वंदन करण्यात आले,त्यावेळी माजी सैनिक तसेच सीमा रक्षा करणारे सैनिक यांच्या कुटुंबियांचे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.पंच प्राण शपथ ग्रहण तसेच करण्यात आली, गावातील मातीचा कलश रॅलीतून मिरवणूक काढण्यात आली,हर घर झेंडा मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी जि प शाळेचे सर्व विद्यार्थी अति उत्साहाने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे ग्रामपंचायत डांगर बु चे लोकनियुक्त सरपंच मा. प्रकाश रंगराव वाघ, ग्रामसेविका सौ. सोनिबाई गुलाबराव पाटील, उपसरपंच राकेश दामू वाघ. ग्रामपंचायत सदस्य. श्री सुदाम शिवाजी सोनवणे. सौ संगीताबाई अर्जुन भील.सौ चिंधाबाई रूपचंद सोनवणे. सौ संगीताबाई वना बैसाणे. सौ मिराबाई युवराज पाटील. सौ सीमा आनंदा पाटील. श्री राजेंद्र बाबुराव कापडणे. श्री विश्वास नामु पाटील ग्रामपंचायत कर्मचारी श्री राकेश नरेंद्र कापडणे. श्री सुभाष जगन्नाथ पाटील. ग्रामरोजगार सेवक कु.सागर सोनावणे व गावातील पोलीस पाटील सौ सुनंदाबाई राजेंद्र खैरनार.तसेच शालेय समितीचे अध्यक्ष श्री महेश पाटील व सदस्य सुपडू भिल , विकास सोसायटीचे चेअरमन श्री शांताराम पाटील व सदस्य , जेष्ठ नागरिक श्री धुडकु अभिमन पाटील अंगणवाडी सेविका सौ ज्योतीबाई पाटील,सौ मंगलबाई वाघ , सौ भटाबाई पाटील,सौ आशाबाई पाटील , आशा वर्कर सौ रंजना मोरे जि प शाळेचे मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील मॅडम , सौ सुरेखा पाटील मॅडम , श्री संजय पाटील सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री रवींद्र मसूले सर व सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






