Aurangabad

मराठवाडा ‘वॉटर ग्रीड’च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी

मराठवाडा ‘वॉटर ग्रीड’च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : लातूर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने मंत्रालयात संबंधित विभाग व मराठवाड्यातील मंत्र्यांची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, बैठकीदरम्यान मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पांच्या कामाला गती देण्याची विनंती अमित देशमुख यांनी केली होती.
राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील,सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे तसेच जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, रोहयो फलोत्पादन मंत्री ना.संदिपान भुमरे या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सदरील मागणीला पाठिंबा देत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी भूमिका मांडली. चर्चेअंती मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
या प्रकल्पामुळे मराठवाड्याची खूप जुनी मागणी मान्य झाली आहे. जायकवाडी, उजनी या शाश्वत स्त्रोतामधून औरंगाबाद, बीडसह लातूर जिल्ह्यासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button