भगीरथ भालके यांना बिनविरोध निवडून देऊन आमदार करावे .समाजसेवक संजय (बाबा)ननवरे
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर येत्या काही दिवसात पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीत कोणतेही राजकारण न करता विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करून कै भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ यांना आमदार करून माणुसकीचे दर्शन घडवावे अशी विनंती येथील समाजसेवक श्री संजय ननवरे यांनी केली आहे.दि २७ नोव्हेंबर२०२०रोजी आमदार भारत भालके यांचे निधन झाले, वास्तविक पाहता जनतेने त्यांना निवडून दिले होते, पण आमदारकीची अजून ४वर्षे शिल्लक असताना त्यांचे निधन झाले, आता ही राजकीय धुरा, विरोधकांनी कोणतेही राजकारण न करता भगीरथ यांच्याकडे द्यावी,विरोधकांनी२०२४ सालची विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने ,सर्वस्व पणाला लावून लढवावी,सध्या विठ्ठल परिवार हा पोरका झाला आहे, ही वेळ राजकारण करण्याची,कुरघोडी करण्याची नाही,अशा कृतीतून चांगला संदेश देण्याची वेळ आली आहे, राजकीय क्षेत्रातही अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात हे सांगण्यासाठी चांगली संधी आहे. पंढरपूर -मंगळवेढा परिसरातील अनेक राजकीय मंडळी अभ्यासू,व कर्तबगार आहेत,राजकीय जीवनात विविध घडामोडी होत असतात, पण कोणीही ते मनात ठेवून किंवा सूडबुद्धीने वागत नाही,ही या दोन्हीही तालुक्यातील राजकीय परंपरा आहे, सध्या तालुक्यातील राजकीय वातावरण गरम आहे,वाढत्या उन्हाप्रमाणेच राजकीय वातावरण तापत आहे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन निवडीवरून मतभेद, वादविवाद होत आहेत श्री विठ्ठल सह साखर कारखाना विविध प्रकारच्या अडचणीत आला आहे, या अशा वातावरणात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.भगीरथ हे नवखे, उदयास येणारे नेतृत्व आहे,व सध्याच्या काळात तेच प्रबळ उमेदवार आहेत,भारत भालके यांचा समाजसेवेचा वारसा ते भक्कमपणे सांभाळतील,दोन्ही तालुक्यातील लोकांचे प्रश्न,विविध अडी अडचणी याची जाणीव त्यांना आहे, भारत भालके यांची कार्यपद्धती त्यांनी जवळून पाहिली आहे, या राजकीय ज्ञानाचा उपयोग निश्चितच ते लोकसेवा करण्यासाठी करतील,यासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून विरोधकांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करून आमदारकीचे प्रबळ उमेदवार भगीरथ भालके यांना संधी द्यावी अशी मागणी समाजसेवक श्री संजय ननवरे यांनी व्यक्त केली आहे.






