बारामतीकरांचे झाले आता इंदापूरच्या मामाने पळविले सोलापूरकरांचे पाणी पालकमंत्र्यांच्या इंदापूरसाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : हो सोलापूर जिल्ह्याच, आपल्या हक्कच पाणी पळवल जातंय, ,पाणी नियोजनात उजनीत पाणीच शिल्लक नाही, मग येणार सांडपाणी दाखवून ते पण चक्क 5 टी एम सी पाणी उजनीतुन उचलायला व इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे तलावात टाकयला परवानगी दिली आहे, मुख्यमंत्री यांची केलेली ही सरळ सरळ दिशाभूल आहे कारण त्यांना घरी बसून परवानगी देताना वस्तुस्थिती सांगितली गेली नसणार नसणार आहे.तसेच 4 बुडीत बंधारा बांधाय ला मंजुरी घेतलीय आहे इंदापूर तालुक्यासाठी फक्त , उन्हाळ्यात पाणी खाली गेलं तरिपन या बंधाऱ्यात कायम पाणी राहणार आहे.पर्यायाने उजनीत वरून येणारे पाणी बंधाऱ्यात साठवुन ठेवणार म्हणजेच खाली येणारे पाणी कमी होणार आहे,लाकडी लिंबोडी वेगळी व हे शेटफल गढे ची योजना वेगळी आहे.अर्थसंकल्पात 1200 कोटी रु मंजूर केलेले लाकडी लिंबोडी या योजनेतून कमीत कमी 2 टी एम सी पाणी उजणीतून उचललं जाणार आहे व शेटफळ गढे साठी 5 टीएमसी म्हणजे एकूण 7 टी एम सी पाणी उजणीतून उचलून इंदापूर बारामती पट्ट्यात नेहल जाणार आहे जे कधीही उजनीच्या पाणी वाटपमध्ये समाविष्ठ नव्हते, *याला सिंचन स्थिरीकरण असे गोंडस नाव दिले आहे(मंजुरी पत्र वाचा)
कृष्णा- भीमा स्थिरीकरण सारख्या चांगल्या योजनेला मोहिते पाटील यांचं राजकीय स्थिरीकरण साठी आहे म्हणून हिनवले गेलं मग आता हे पाणी योजना पवारांचे कुटूबांचे हे राजकीय स्थिरीकरण नाही का?
सुप्रिया सुळेच दर खासदरकी ला घटत मताधिक्य व भाजपकडून त्यांना घेरण्याची पूर्ण तयारी यामुळे पवार कुठंब अस्वस्थ झाला आहे .हे असंच चालू राहील तर एकीकडे उजनीत येणारे पाणीच वरचे नेते प्रत्येक तालुक्यात मोठं मोठे बंधारे बांधून अडवतील त्यासाठी वेगळवेगळे नावाखाली हे पाणीचोरी चालू राहील. मग उजनीत काय फक्त शिल्लक राहिलेल्या गाळ बघत बसायचा का बाकीच्या तालुक्यांनी ?
उजणीवर अजून पूर्ण न झालेल्या व अर्थवट योजना बऱ्याच आहेत
त्या खालील प्रमाणे.
बार्शी उपसा सिंचन योजना 2.59 TMC
सिना माढा उपसा सिंचन योजना 4.50 TMC
दहीगाव उपसा सिंचन योजना 1.81 TMC
भिमा सिना जोड कलवा 3.15 TMC
सांगोला उपसा सिंचन योजना 2 TMC
एकरूख उपसा सिंचन योजना 3.16 TMC
आष्टी उपसा सिंचन योजना 1 TMC मंगळवेढा 35 गावांसाठी 6 टी एमसी,
दक्षिण सोलापूर 22 गावे साठी पिण्याच्या पाणीयोजना,
रोहित पवार*आमदार झाल्यामुळं आणखी नवा धोका निर्माण झाला आहे कर्जत- जामखेड साठी एक नवी योजना मंजूर केली गेली आहे,भीमा खोऱ्यातील पाणी नगर जिल्ह्यात नेहण्याचं कारण नाही तरीसुद्धा त्याला आमदारकी टिकवायची असेल तर कायम दुष्काळी असणाऱ्या या तालुक्यांना रोहित पवार अजून नवी योजना करून नक्की पाणी नेहणार हे स्पष्ट आहे.म्हणजे पवार कुटुंबातील व्यक्तींच्या आमदारकी, खासदारकी टिकवण्यासाठी यांनी उजनी धरणाचं पाणी पळवायच पक्के नियोजन आहे.
मराठवाडा साठी उजणीतून जाणारे 21 टीएमसी (एकदा बोगदा बघून या उजनी वजा शून्य झालीतरी पाणी जाईल एवढा मोठा व पाणीच काय वाळू सुद्धा वाहून नेईल एवढा मोठा बोगदा आहे*) या उजनी धरणावर अवलंबून असलेल्या उपसा सिंचन योजना आहेत पण या योजना पूर्णत्वास गेल्यानंतर उजनीच्या अवस्था काय होईल याचा विचार करा.?
सांडपाणी उचलण्याच्या नावाखाली उजनीतून 5 टीएमसी पाणी उचलायला परवानगी मुख्यमंत्री यांनी दिली, त्यांना मुंबईत बसून उजनीत किती सांडपाणी येते व येणाऱ्या सर्व सांडपाण्यावर फक्त इंदापूर बारामतीचा हक्क आहे का. त्यासाठी सोलापूर व करमाळा सारख्या दुष्काळी तालुक्यात एकादी योजना पालकमंत्री म्हणून भरणेंना का करावीशी वाटली नाही❓ सोलापूर जिल्ह्यातील मुर्दाड लोकप्रितिनिधी हे बारामती करांचे तळवेचाटू आहेत त्यांना माढा तालुक्यात आहे या स्कीम ला 2/5 कोटी चा निधी दिला की गप्प बसतात,?करमाळात पण तीच परिस्थिती दहिगाव ला 1/2 कोटी दिले की ते गप्प?, पंढरपूर- मंगळवेढा ला 35 गावच योजना देतो म्हणून गाजर दाखवलं की ते गप्प,?अक्कलकोट ला कुरनुर ला थोडा निधी द्यायचा व 30 वर्षांपासून ते काम चालू आहे पूर्ण होऊ द्यायचं नाही?, सांगोला ला टेम्भू,ताकारी,उजनी वेगळवेगली अमिश दाखवायची? व दरवर्षी,दुष्काळी पाणी परिषदा घ्यायच्या* ते पण शांत राहतात, माळशिरस वाल्याच हक्काचं पाणी नीरा डावा- उजवा वादात कमी जास्त करायचं, अस सगळी कट कारस्थानं करून या लोकप्रतिनिधी ना कोंबड्यासारखं झुंजवत ठेवायच व गपचूप पाणी बारामती भागात पळवायचा हेच गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे.उजनी धरण पवारांच्या परसातील हौद असल्या सारखे पवार कंपनी कडून यातील पाण्याचा वापर बेमालूम पणे चालू आहे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जरी पडला जनतेच्या घशाला कोरड जरी पडली तरी बारामती एमआयडीसीला अविरत पणे उजनीचे पाणी चालू असते राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते उष्ट्या पाण्याचे धनी आहेत म्हणून गप्प आहेत. याउलट उजनीत पाणी आणण्याचे काम करणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना याच पवारांनी अडवून ठेवली आहे, उजनीत वरून एक थेंब पाणी आणायची कुठलीच योजना नाही मात्र उजणीतून पाणी उचलण्याच्या भरमसाठ योजना मंजूर केल्या जात आहेत यात स्वत च्या घरा दाराचा, जमिनीचा त्याग केलेले सोलापूर जिल्ह्याला काहीच पाणी मिळत नाही मात्र धरणासाठी काहीही त्याग नसलेलं बारामती व कर्जत- जामखेड तालुके सत्तेच्या जोरावर अनावश्यक लाभ घेताना दिसत आहेत हे कुठतरी थांबले पाहिजे.शरद पवार, अजित पवार यांना व्यक्तिगत विरोध नाही त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी राबविलेल्या “सवतीच्या प्रेमाच्या” पाॅलिसीला विरोध आहे पवारांच्या नितीमत्तेला विरोध आहे राष्ट्रवादीच्या स्वार्थी विचारांना विरोध आहे. आता कोणतच इलेक्शन नाही आमच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा निवडणूकी पूरता मर्यादीत मुद्दा होऊ शकत नाही हा दुष्काळी भागातील लोकांच्या जीवनावश्यक,मूलभूत विषयाचा मुद्दा आहे.
भविष्यात आपल्याला पाण्यासाठी संघर्ष अटळ आहे आणि यावरूनच खर राजकारण होणार आहे.






