भीमराज गायकवाड व चर्मकार अल्पवयीन मुलीवर आत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी व स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा -भिम आर्मी ने जिल्हाधिकारी यांना निवेदन
लातूर च्या भिम आर्मी ने जिल्हाधिकारी याचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांचे कडे निवेदना द्वारे केली
मागणी
प्रतिनिधी :- लक्ष्मण कांबळे
अन्यथा.
आम्हास स्वसंरक्षणार्थ कायदेशीर शस्त्रपरवाना मिळावा.
आम्ही सदरहू निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधू इच्छितो की, फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दिवसेंदिवस जातीय मानसिकतेतून होणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ होत आहे. आघाडी सरकारच्या कारकिर्दीत ह्यास पायबंद बसेल अशी आम्हास आशा होती,परंतु आमची आशा फोल ठरली असून , आघाडी सरकारमध्ये सुद्धा आम्ही सुरक्षित नाही ,अशी आमची पक्की धारणा निर्माण झाली आहे , ही भावना निर्माण होण्यास ,राज्यात घडणाऱ्या दलित अत्याचाराच्या घटना कारणीभूत आहे.आज देखील माणुसकीला काळिमा फासणारी , महाराष्ट्रातील प्रत्येक संवेदनशील मनाला शरमेने मान खाली घालायला लावायला भाग पाडणाऱ्या दोन घटना नुकत्याच महाराष्ट्रात घडल्या.* नागपूरच्या सावनेर तालुक्यातील कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुरादेवी येथे आमच्या चर्मकार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर काही हैवानांनी पाशवी बलात्कार केला.त्यानंतर औरंगाबादच्या वैजापूर येथे भीमराज गायकवाड ह्या तरण्याबांड नवतरुणाचे शीर धडापासून कापून वेगळे करण्यात आले,त्याच्या कुटुंबियांना गंभीर जखमी करण्यात आले.
काय गुन्हा होता ह्या गायकवाड कुटुंबीयांचा ? ह्या परिवारातील व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे हा गुन्हा आहे काय ? दिवसाढवळ्या ह्या राज्यात आमच्या नवतरुण मुलाचे शीर कापून फेकल्या जाते , दुर्दैवाने हाच प्रकार एखाद्या उच्चभ्रू-उच्चवर्णीय समाजातील व्यक्तीच्या बाबतीत घडला असता तर शासन म्हणून आपण अशीच बघ्याची भूमिका घेतली असती काय ? की आमचा जीव ,हा जीव नसतो काय ? की आम्हाला जगण्याचा अधिकारच नाही काय ? ह्या निर्ढावलेल्या नीच मानसिकतेच्या अपराध्यांना महाराष्ट्र शासनाची भीती वाटत नाही काय ?* ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून अपेक्षित आहे.
आम्ही ह्या निवेदनाद्वारे ह्या दोन्ही प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी , अशी मा.मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासनाला जाहीर मागणी करतोय.आमच्यावरील वाढते अत्याचार रोखण्यास आपण असमर्थ व हतबल असाल ,तर मग आम्हाला आमच्या स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा कायदेशीर परवाना मिळावा असे आम्ही सदरहू लातूरच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लातूरच्या भिम आर्मी ने मागणी केले आहे.
निवेदनावर भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे,जिल्हा प्रमुख विलास चक्रे, बबलू शिंदे, बबलू गवळे आदी भिम आर्मी च्या कार्यकर्त्याच्या स्वाक्षरी आहेत.






