जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू..पण उपयोग आहे का..? नियम फक्त सामान्य माणसाला..!राजकीय नेत्यांचं काय..?
जळगाव कोव्हिडं 19 आणि सण समारंभ व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. या नुसार जळगाव यांचेकडील दि. 13 ऑगस्ट, 2021 च्या आदेशातील अटी लागू राहतील.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.असे जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
सदर नियम फक्त सामान्य माणसाला लागू असून राजकीय पुढारी,नेते,आंदोलने, रॅली ह्यांना लागू नसल्याचे दिसून येत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून राजकीय लोकांच्या रॅली,आंदोलने सुरू आहेत.त्यांना कोणताही प्रशासकीय अधिकारी अडवू शकत नाही. पण सामान्य माणसाला मात्र नियम कायदे कानून,शिक्षा यांचा बडगा दाखवून एक तर्फी नियम लागू करण्यात आले आहेत. असे असेल तर शासनाने कोणतेही नियम जनतेवर लादू नये अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.






