Surgana

ऊंबरठाण येथे जमावबंदी व संचारबंदी आदेश भंग करणाऱ्या मद्यपिंना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद.परराज्याच्या सिमा लाॅकडाऊन. अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार.

ऊंबरठाण येथे जमावबंदी व संचारबंदी आदेश भंग करणाऱ्या मद्यपिंना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद.परराज्याच्या सिमा लाॅकडाऊन. अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार.

सुरगाणा ता.24/3/2020 विजय कानडे

तालुक्यातील सुरगाणा,ऊंबरठाण, पांगारणे,बर्डीपाडा, बा-हे येथे अवैधधंदे दारु,जुगार,मटके बंद.

अवैद्य धंद्यामुळे ऊंबरठाण येथे जुगार, मटका खेळण्या करीता गुजरात,दीव दमण, दादरा नगर हवेली या पर राज्यतून येणा-यांची गर्दी होत असे त्यामुळे ऊंबरठाण हे नेहमीच वर्दळीचे, गजबजलेले ठिकाण होते मात्र जमावबंदीच्या आदेशानुसार शुकशुकाट पसरलेला आहे.तालुक्यात जमावबंदी आदेशाची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरु असुन गुजरात लगतच्या राज्याच्या सिमेवर चेकपोस्ट तयार करण्यात आले असून परराज्य गुजरात राज्यातून येणाऱ्या कोरोना संशयित प्रवासांची पथका मार्फत कसुन तपासणी करण्यात येत आहे ऊंबरठाण येथील चेक पोस्टवर जात असतांना एका अनाधिकृत जागेवर पोलिसांना जमावबंदी आदेश असतानाही गर्दी दिसून आली हि बाब पोलिस पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या नजरेतून सुटली नाही त्यांनी ताबडतोब गाडी थांबवून पाहणी केली असता काही टोळकं मद्यपान करत असल्याचे दिसून आले.त्यांनी संपुर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली असतांना तुम्हांला मद्य पिण्याचे येऊन पडले आहे.असा संताप व्यक्त करीत करीत मद्यपिंची कडक शब्दांत कान उघडणी करीत लाठीचा प्रसाद देत पिटाळून लावले.

पोलिसांनी तालुक्यातील राज्याच्या सिमांवर अचानक धाडी टाकून पाहणी केली यामध्ये आहवा डांगची सिमारेषा सापुतारा, बोरगाव,हतगड, सुरगाणा शहरानजीक तळपाडा,लाडगाव, खुंटविहिर,पिंपळसोंड तसेच बलसाड, धरमपुर जिल्ह्य़ाची ऊंबरठाण,रघतविहीर, मांधा,सुरत जिल्हयाची सिमा बर्डीपाडा,पांगारणे आदि महत्वपूर्ण राज्याच्या सिमांवर परराज्यतून येणाऱ्या प्रवासांवर कडक नजर ठेवून चेकपोस्ट वर वाहनांची व प्रवासांची तपासणी करण्यात येत आहे.या पथकामध्ये आरोग्य विभाग,पोलिस यंत्रणा,वनविभाग तसेच महसूल विभागाचे कर्मचारी आहेत.काही तरुण दुचाकीवरून हकनाक फिरत आहेत त्यांना सुचना करण्यात येत आहेत.

सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र सीमेवरील गुजरात सिमा बंद.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात कडुन येणारी सर्व वाहनांची तपासणी उबरठान जवळील निबारपाडा,बर्डीपाडा, तळपाडा,या सीमांवर करण्यात येत असुन केवळ अत्यावश्यक कामासाठीच वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.तालुक्यात आहवाडाग,धरपुर,बलसाड,वासदा,या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.या ठिकाणी सुरगाणा पोलिस निरीक्षक दिवानसिग वसावे,उपनिरीक्षक सागर नांद्रे,पोलिस हवालदार हेमंत भालेराव,महेश डंबाळे,संतोष गवळी, राहुल जोपळे तसेच आरोग्य कर्मचारी,वनविभागाचे कर्मचारी,महसूलचे कर्मचारी,तैनात असुन कसून चौकशी केली जात आहे.

प्रतिक्रया –
“राज्यात 31 मार्च पर्यंत जमावबंदी आदेश असून कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव रोखण्याच्या पार्श्वभुमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे व आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.कायदा व नियम मोडणा-यांवर नाईलाजाने गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांनी संयम पाळत प्रशासनास सहकार्य करावे.’
पोलीस निरीक्षक – दिवानसिंग वसावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button