सरसकट ५०% सवलत देणारी अरिहंत पब्लिक स्कूल – डॉक्टर शितल शहा
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर बालरोग तज्ञ डॉ.शितल के. शहा यांचे शैक्षणिक,शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान आहे. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाने सर्वांनाच आर्थिक कोंडीत ढकलून दिल्याने आर्थिक उलाढाल असलेले उद्योग, व्यवसाय बंद , शाळा-कॉलेजही बंद होती.त्यामुळे शाळेतील मुलांच्या शैक्षणिक फी चा प्रश्न शाळा, कॉलेज समोर आ वासून उभा होता. या परिस्थितीचे भान असलेल्या डॉ शीतल के.शहा यांनी त्यांच्या अरिहंत पब्लिक स्कूल ज्या शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत त्यात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये ५०% सवलत देऊन दिलासा दिला आहे.
अरिहंत पब्लिक स्कूल या ठिकाणी जी शेकडो मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्या सर्व मुलांचे पालक हे फी मध्ये सवलत मागत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची कोरोना काळापूर्वीची फी येणे बाकी असतानाही समाज मन आणि परिस्थितीची जाणीव ठेवत डॉ शीतल के.शहा यांनी संस्थेच्या आवारात फी माफीसाठी ठिय्या देऊन बसलेल्या पालकांना सर्वच मुलांना सरसकट ५०% सवलत देऊन दिलासा दिला आहे. राज्यात फी चा प्रश्न संस्था,शासन स्तरावर तसेच न्यायालयाच्या कक्षेत असल्याने तो सुटण्याअगोदर कोरोनाने आर्थिक फटका बसल्याने फी सवलतीने थोडाफार भार हलका व्हावा असे वाटल्याने ५०% सवलत दिली असल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे मात्र ही सवलत फक्त कोरोना काळापुरती मर्यादित असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संस्था चालवताना येणाऱ्या अनेक अडचणींना त्यातल्या त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय तोंड देत वाटचाल ही या पालकांच्या खंबीर पाठिंब्यावर सुरू राहणार असल्याचे त्यांनी मत प्रदर्शित केले.अरिहंत पब्लिक स्कूल ही पहिली शिक्षण संस्था असेल जिने पालक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरसकट थेट ५०% कोरोना काळातील शिक्षणा साठी सवलत जाहीर करून सर्वांपुढे योग्य असा आदर्श ठेवला आहे.






