Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना आज आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्राना वेळ वाढवून द्यावी व व्यवसाय सुरू करण्यासाठी सहनुभुतीपूर्वक विचार करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना आज आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्राना वेळ वाढवून द्यावी व व्यवसाय सुरू करण्यासाठी सहनुभुतीपूर्वक विचार करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
अमळनेर : येथील उपविभागीय अधिकारी यांना आज आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्राना वेळ वाढवून द्यावी व सर्वच व्यापारी बांधवाना देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी सहनुभुतीपूर्वक विचार करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या मार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा/जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्राना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत सूचित केले आहे.तरी लहान व्यवसायिक (ठेला गाडी,भाजीपाला विक्रेते) यांना व्यवसाय करण्यास वेळ पुरेसा नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी सकाळी 10 वाजे पर्यत कर्तव्य बजावत असल्याने त्यांना बाजार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे .त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विक्री सह इतर विक्री केंद्र( कापड दुकान, सराफ बाजार,भांडे विक्री ,जनरल स्टोर्स, यांसह सर्व) आदी विक्रेत्यांचे दुकाने सुरू करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा.
वरील बाबी लक्षात घेता नगरीक(महिला) व व्यवसायीक साधारणतः 9 ते 10 वाजे नंतर घराबाहेर निघत असल्याने व ग्रामीण भागातील बांधव देखिल 9 वाजे पर्यँत शहरात बाजारासाठी दाखल होत असता त्यामुळे वेळे अभावी बाजार पेठेत मोठी गर्दी होत असते. तरी सदर वेळेत वाढ केल्यास गोर गरीब व्यवसायिकां ना मोठा आधार मिळू शकतो.त्यास अनुसरून सकाळी 11 वाजे ऐवजी 2 वाजे पर्यत सूट देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे देण्यात आले आहे.निवेदनावर गटनेते प्रवीण पाठक, उपगटनेते सौ.सविता संदानशिव, प्रतोद सलीमभाई टोपी, सौ.ज्योती महाजन,श्रीराम चौधरी,श्रीमती मायाबाई कैलास लोहेरे,सौ.किरणबाई जाधव,सौ आशा किरण बागुल,नरेंद्र चौधरी ,देविदास महाजन, सौ कल्पना चौधरी, अनिल महाजन आदीच्या स्वाक्षरी ने निवेदन दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button