Maharashtra

भाजपची भाजपा’ची नवी कार्यकारिणी जाहीर

भाजपची भाजपा’ची नवी कार्यकारिणी जाहीर

पंकजा मुंडेंना केंद्रात जबाबदारी

तर खडसे, तावडे फक्त निमंत्रित

कोल्हापूरःआनिल पाटील

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती.

नाजार असलेल्या पंकजा मुंडें यांना पक्षाच्या पातळीवर केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे असं पाटील यांनी सांगितलं. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

यात १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस,१ महामंत्री संघटन, १ कोषाध्यक्ष, १२ सचिव, ७ मोर्चांचे अध्यक्ष, कार्यकारी सदस्य ७९,

सरचिटणीस –

◆ सुजीतसिंह ठाकूर,
◆चंद्रशेखर बावनकुळे,
◆ देवयानी फरांदे, ◆ रवींद्र चव्हाण,
◆ श्रीकांत भारतीय

*उपाध्यक्ष -*

◆ राम शिंदे
◆चित्रा वाघ
◆कपील पाटील
◆प्रसाद लाड
◆माधव भांडारी
◆सुरेश हळवणकर, ◆ प्रीतम मुंडे

मुख्य प्रतोद –

आशीष शेलार

प्रतोद माधुरी मिसाळ

नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार-चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र सर्वात महत्त्वाची घोषणा त्यांनी केली ती ही की पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्येंना जबाबदारी दिल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या १०० टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असं चंद्रकांत पाटील यांनी काही वेळापूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोन वेगळ्या खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली असं काहीही नाही. आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button