अंगणवाडी सेविकाना मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमुळे मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेंची परवड सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना मानधन देखील मिळाले नाही. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर शहरातील गरजू अंगणवाडी सेविकेंना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनीअंगणवाडी सेविका प्रमुख छाया खंडागळे यांच्या उपस्तीत अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशातच अंगणाड्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. तोकड्या मानधनावर अंगणवाडी सेविका काम करत आहेत. त्यातच कोरोनामुळे त्यांना मानधन ही मिळाले नाही. मानधन मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.लाॅकडाऊन असल्यामुळे घरीच बसून असलेल्या अंगणवाडी सेविका सध्या आरोग्य विभागाला सहकार्य करत आहेत. परंतु आर्थिक अडचणीमुळे अंगणवाडी सेविका व त्यांचे कुटुंबिय अनेक समस्यांना सामोरे जात आहे.
अंगणवाडी सेविकेंची गरज ओळखून त्यांना गहू, तांदुळ, साखर, मास्क, यासह जीवनावश्य वस्तूंचे मोफत वाटप केले.ऐन संकटाच्या काळात दिलीप धोत्रे धावून आल्याची भावना येथील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला. यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा छाया खंडागळे, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके, ,ओंकार कुलकर्णी, ,योगिता गुरव, आशा गुरव,आशा कांबळे, मनीषा हेंद्रे,अलका राऊळ, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.






