Kolhapur

हिंदी भाषेचे सुप्रसिद्ध कवी श्री. किशोर वाघमारे उर्फ संबोधी यांचा दिल्ली येथे सन्मान

हिंदी भाषेचे सुप्रसिद्ध कवी श्री. किशोर वाघमारे उर्फ संबोधी यांचा दिल्ली येथे सन्मान

सुभाष भोसले -कोल्हापूर
भाषा सहोदरी हिंदी यांच्यावतीने हंसराज विश्‍वविद्यालय दिल्ली येथे सातवे आंतरराष्ट्रीय हिंदी अधिवेशन व साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यामध्ये श्री महांकाली हायस्कुल व जुनिअर कॉलेज कवठेमहांकाळचे कवी किशोर वाघमारे यांनी हिंदी भाषेची स्वयम् रचित गझल सादर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जयकांत मिश्रा, सी.पी.ठाकुर, सुधीर त्रिवेदी,नंदकिशोर पांडे, दत्तात्रय सावंत,नित्यानंद ,कवी राजेंद्र चेतन, प्राचार्या रमाजी आदी मान्यवर उपस्थित होते.या अधिवेशन व साहित्य संमेलनास भारत देशातून भारत देशाच्या विविध राज्यातून अनेक नामांकित लेखक व कवी उपस्थित होते.कवी किशोर वाघमारे यांनी आजपर्यंत २ मराठी काव्यसंग्रह,एक गीत संग्रह तसेच शंभर हिंदी गझल ,शंभर हिंदी कविता तसेच पाच प्रवासवर्णने लिहिली आहेत.शाळेत परतल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक एस. एन.भोसले व एम.बी.माने तसेच हिंदी विभाग प्रमुख एम.एस.सपकाळ ,सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले व सत्कार केला. किशोर वाघमारे (संबोधी )यांना संस्थेचे प्रमुख अशोकराव (बापू) जाधव यांचे आशीर्वाद व सहकार्य लाभले.राष्ट्रीय पातळीवरील साहित्य लेखनाबद्दल किशोर वाघमारे (संबोधी) यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button