छत्रपती शिवाजी महाराज चौकात संचारबंदी च्या नावाखाली झुंडीने पोलीसांची दादागिरी अमृत सचदेव व अनिल वानखेडे यांचा आरोप….
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाँकडाऊन व संचारबंदी च्या नावाखाली पोलीसांचा झुंडीने तथा उभा असतो आणि अत्यावश्यक वस्तू व अथवा ओषधे घ्यायला जाणाऱ्या व भाजीपाला किंवा दवाखान्यात जाणाऱ्या अथवा लहान लहान मुलांसाठी दुध घेण्यासाठी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना मोटारसायक वरून उतरवुन मास घातलेल्या असतानासुद्धा बळजबरीने आथिर्क दंडाची पावती पोलीस कर्मचारी देत असल्यासचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृत सचदेव व मनसेचे नेते अनिल वानखेडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री प्रविण मुढे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र रायसिंग साहेब याच्यांकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे हे पोलीस कर्मचारी सामान्य माणसाचा मोटर सायकलची चाबी दादागिरीने काढून घेतात आणि त्यामुळे सामान्य माणूस रडकुंडी मँटकुटीला जातो. पोलीसांना खरोखरच जर कारवाई करायची असेल तर त्त्यानी अवैध धंदे करणाऱ्या लोकावर कार्यवाही करावी अथवा रिकामटेकडे शहरात प्रत्येक चौकात फिरणारे लोकांवर कारवाई केली पाहिजे तर सामान्य माणसे या पोलीसांना आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत गोरगरीब वर्गाला व सामान्य माणसाला पोलीस दुडंका दाखवून उपयोग काय ?
असा सवाल ही या निमित्ताने करण्यात आला आहे. या पोलीस झुंडशाही अनुभव शहरातील नामांकित डाँ एस टी पाटील याचे चिरंजीव यांना भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शीतीज चोरडिया सहित सामान्य नागरिकांना या तीन दिवसात आलेला आहे यासदंर्भात वरिष्ठांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणीही श्री अमृत सचदेव व अनिल वानखेडे यांनी केली आहे.






