Maharashtra

प्रांतअधिकारी सचिन ढोले साहेब यांचे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना आव्हान

प्रांतअधिकारी सचिन ढोले साहेब यांचे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना आव्हान

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर मध्ये सध्या कोरोना संसर्ग रोगाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पंढरपूरकरांच्या चिंतेत वाढ होत असून, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनतेने काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी जनतेने काय काळजी घेतली पाहिजे याबाबत आवाहन केले आहे.अत्यंत गरजेचे असल्याशिवाय आपले गाव सोडू नका. मुंबई,पुणे,सोलापूर ला जाणे शक्यतो टाळावे. ज्येष्ठ नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये उपचारासाठी दवाखान्यात गेल्यावर योग्य ती काळजी घ्यावी. लग्न समारंभ वास्तुशांती, सभा, बैठका, रक्षाविसर्जन, जेवणावळी, अंत्यविधी अशा ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. जर जाणे आवश्यक असेल तर योग्य अंतर ठेऊन रहावे. या ठिकाणी वेगवगळया गावातील नागरिक येत असल्याने लोकांना संसर्गाचा धोका जास्त होऊ शकतो. जर आपल्या गावामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना शाळेमध्ये किंवा मठात ठेवावे असे देखील त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. शेतातील मजूर स्थानिक असतील याची दक्षता घ्यावी. विनाकारण कोणीही फिरू नये. जर काही खरेदी करायची असेल तर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापनांना प्राधान्य द्यावे असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले याने जनतेला केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button