Maharashtra

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये पालकांसाठी ऑनलाईन वेबिनार संपन्न

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये पालकांसाठी ऑनलाईन वेबिनार संपन्न

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूलमध्ये पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. या वेबिनार मध्ये पहिली आणि दुसरीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना पंढरपूर येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. संगीता पाटील यांनी मार्गदर्शन केले.सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू करणे सध्यातरी अशक्य आहे. परंतु राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष जून पासून चालू केलेले आहे. शासन निर्णयानुसार पहिली आणि दुसरी मधील विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे चालू ठेवावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते. कोरोनामुळे बदलेल्या परिस्थितीत पालकांच्या आपल्या पाल्याच्या बाबतीतल्या जबाबदाऱ्या देखील बदलल्या आहेत. त्यानुसार लोटस इंग्लिश स्कूलने वेबीनारच्या माध्यमातून पालकांशी विविध विषयांवर संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण, लहान मुलांच्या रागावर नियंत्रण कसे आणता येईल, मोबाईल गेममुळे होणारे दुष्परिणाम, आई-वडिलांबरोबर मुलांचं असणारं नातं, ऑनलाइन शिक्षण हा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता जागृत करणे, घरची ऑनलाइन शाळा, शाळेकडून मिळणाऱ्या माहितीमध्ये भर घालून ती मुलांना देणे ही काळाची गरज इत्यादी विषयांचा समावेश होता.
या ऑनलाईन वेबिनार मिटिंगसाठी पहिली आणि दुसरीचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पडवळ हे देखील उपस्थित होते. या वेबिनार मिटींगचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या प्रमुख सविता झांबरे यांनी केले. प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांनी वेबिनारमधील महत्वाचे मुद्दे पालकांसमोर मांडले तर शिक्षिका प्रतिभा नाईकनवरे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button