लामजना पाटी येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी
लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लामजना ते लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली व लामजना पाटी येथील भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन युवा नेते जि.प.सदस्य मा.शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले यावेळी सभापती पं.स.औसा सौ.अर्चनाताई गायकवाड,उपसभापती विस्वास काळे,गोंविद बाजुळगे,सरपंच लामजना जहीदाबी पापुमियॉ पटेल,माजी नगरसेवक विवेक मिश्रा,औसा काँग्रेस शहराध्यक्ष शकिल शेख,गौरीशंकर बोमने,रामेश्वर मुळे,दतोपंत आळंणे,बजरंग बाजुळगे,विजयकुमार बाजुळगे,संजय लोंढे,अमित मुळे,युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महाल्लिंग बाबशेट्टी,अमोल पाटील,जिवण पाटील,धनराज बिराजदार,ग्यानदेव जगताप,सिराज पटेल,श्रीराम बोडके,बप्पा माडजे गणेश पाटील व असंख्य शिवभक्त उपस्थित होते.






