Jalgaon

Jalgaon Live : पाऊस आला पाऊस आला…!जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी…

Jalgaon Live : पाऊस आला पाऊस आला…!जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी…

जळगाव संपूर्ण उन्हाळ्यात जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलेले होते. वाढत्या तापमानाने नागरिक होरपळून निघाले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, अचानक आलेला हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे.

दरम्यान, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा तडाखा, ढगाळ हवामान आणि उकाडा कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगावात पावसाची हजेरी लावली असून लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी काल देखील जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी सायंकाळी तासभर जोरदार पाऊस झाल्यामुळे जळगावकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जोरदार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. दरम्यान गेली दोन दिवस दिवसभर उन्हाचा चटका बसत असून सायंकाळी पाऊस पडत असल्याचं साध्याच चित्र आहे. आज दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवेल. सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अमळनेर मध्येही सायंकाळ पासून पावसाचे वातावरण झाले असून जोरदार पावसाचा अंदाज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button