Amalner

Amalner: सुप्रिम पाटील यांना “”आशिया स्टार कलाकार “” पुरस्कार

Amalner: सुप्रिम पाटील यांना “”आशिया स्टार कलाकार “” पुरस्कार

अमळनेर : तालुक्यातील कोंढावळ येथील सुप्रिम पाटील यांना आशिया स्टार कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ यांच्या मार्फत हा पुरस्कार उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.यात सुप्रिम पाटील यांनी कोविड काळात आणि त्या आधी देखील गावा गावात जाऊन समाजात जनजागृती करण्याचे कार्य हे पथनाट्याच्या माध्यमातून केले,त्यात प्रमुख सामाजिक समस्या यांच्यावर प्रकाशझोत टाकत त्यांनी गावोगावी जाऊन कोविड विषयी जनजागृती ,अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकता, मोबाईल चे दुष्परिणाम, दारूबंदी, व्यसनमुक्ती,बेटी बचाव बेटी पढावो,स्त्री भ्रूणहत्या, एड्स जनजागृती, शासकिय योजनांची माहिती, ग्राहक जागृती अभियान असे बरेच विषय हाताळत त्यांनी सामजिक जनजागृती चे कार्य केले आहे आणि या सर्व बाबींचा विचार करता त्यांना नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ तर्फे “आशिया स्टार कलाकार ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,ते एक उत्कृष्ट किर्तनकार देखील आहेत,त्यांना राज्यस्तरीय आदर्श कीर्तन सेवा प्रबोधनरत्न पुरस्कार,तसेच कोविड योद्धा,तसेच राष्ट्रिय सेवा योजना राष्ट्रिय एकता शिबिर झारखंड,स्वच्छ वारी निर्मल वारी ( पुणे- पंढरपूर) यात सक्रिय सहभाग घेत,तिथं देखील त्यांनी पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती केली,तिथं त्यांना सन्मानचिन्हं,प्रमाणपत्र,गोल्ड मेडल ने सन्मानीत करण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करता त्यांना आशिय स्टार कलाकार पुरस्कार देण्यात आला, पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र,गोल्ड मेडल असे देण्यात आले, सुप्रिम पाटील यांना पुरस्कार प्राप्त झाला असे कळताच सर्व स्तरावरून शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला.त्यात कवियत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक:प्रा.डॉ.सचिन नांद्रे, तसेच विद्यार्थी विकास अधिकारी जळगाव विद्यापीठाचे,: प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी सर , तसेच आजीवन अध्यन व विस्तार विभागाचे, प्रा.डॉ.मनीष जोशी सर
प्रा.डॉ. सुभाष पवार सर,विद्यापीठाचे सीनेट सदस्य: दिनेश दादा नाईक,त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर,चेअरमन:सुभाष दादा भांडारकर,तसेच अभिजित दादा भांडारकर,प्राचार्य: डॉ.पी. एस.पाटील, सर प्राध्यापक वृंद प्रा.डॉ. अस्मिता सरवैय्या, प्रा.डॉ.अनिता खेडकर ,प्रा.डॉ.श्रेव्ता वैद्य,प्रा.डॉ. जगदीश सोनवणे,प्रा.डॉ. सागरराज चव्हाण,प्रा.डॉ. भरत खंडागळे,प्रा.विजयकुमार वाघमारे,प्रा.बोरसे सर,प्रा. धनराज ढगे, यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button