जळगांव सह अमळनेर शहरातील नो व्हेइकल झोन रद्द..जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश
नूरखान
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च
2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा लागू करण्यात आला आहे.
जळगांव सह अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात दिनांक 07 जुलै, 2020 चे सकाळी 05.00 वाजेपासून ते दिनांक 13 जुलै, 2020 चे रात्री
12.00 वाजेपावेतो लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. दि 14 जुलै 2020 रोजी सदर लॉकडाऊन कालावधी संपुष्टात आल्यानंतर
नागरिकांची एकदम होणारी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने तसेच टप्याटप्याने गर्दीच्या ठिकाणी वाहनांची व नागरिकांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टिने कार्यालयाचे आदेश दिनांक 14 जुलै, 2020 अन्वये जळगांव शहर महानरगपालिका, अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी ‘No Vehicle Zone’ म्हणून घोषित करण्यात आलेला होता.
परन्तु आता जळगांव शहर महानरगपालिका, अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी ‘No Vehicle Zone’ सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही, असे मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घोषित केले असून दिनांक 27 जुलै, 2020 पासून जळगांव शहर महानरगपालिका, अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका हद्दीतील
गर्दीच्या ठिकाणी घोषित करण्यात आलेले ‘No Vehicle Zone’ रद्द करण्यात येत आहेत.






