Pune

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 5800 बेल व देशी रोपांचे वाटप

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 5800 बेल व देशी रोपांचे वाटप

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बेल व तसेच देशी रोपांचे वाटप करण्यात आले.
प्रातिनिधिक स्वरूपात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना या रोपांचे वाटप करण्यात आले.
देशी रोपांच्या माध्यमातून ऑक्सीजन पार्क उभा करण्याचा संकल्प यानिमित्त करण्यात आला आहे.
बेलाचा वृक्षात आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत पोट दुखी पासून ते मधुमेह समस्यांवर बेल गुणकारी आहे. अशा पचनशक्ती व स्मरणशक्ती वाढवणार्‍या बेल वृक्षाचे वृक्षारोपण तसेच देशी वनस्पतींचे वृक्षारोपण करून नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी महाविद्यालय वेळोवेळी विविध उपक्रमातून नैसर्गिक पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असते. गतवर्षी हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1001 बेलाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयामध्ये गेल्या दहा वर्षापासून संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचा वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा केला जात असतो. मान्यवरांचे स्वागत देखील रोपटे देऊन केले जाते.बेल हे देशी वृक्ष असून भारतीय परंपरेत बेलास महत्त्व आहे. 5800 बेल व देशी रोपांचे नागरिकांना वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला जाणार आहे.
आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी ऑक्सीजन पार्क याठिकाणी प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून तसेच पेढे वाटून हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
सायन्स विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड, क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ आणि सहकारी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button