हेमाडपाडा येथे सॅनिटायझरचे वाटप
सुरगाणा प्रतिनिधी दीपक भोये:-
सुरगाणा तालुक्यातील हेमाडपाडा, सादूडणे, मुरूमदरी, वडपाडा व रानपाडा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना सारख्या साथीच्या आजाराने अनेक देशात धुमाकूळ घालत आता भारतातील अनेक राज्यात धुमाकूळ घातला असल्यामुळे अशा साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी स्वतानेच स्वतःची जबाबदारी घेऊन काळजी घेतली पाहिजे. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझर कडे हात स्वच्छ साफ करणे गरजेचे आहे. तसेच विनाकारण गावात फिरणे, गावाच्या बाहेर जाणे टाळावे, असे ग्रामसेवक राजेंद्र खांडवी यांनी सांगितले.
नवसंकल्प एकता परिषद महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष दीपक भोये यांनी सांगितले की, अत्यावश्यक सेवेसाठी जाताना एक मीटर चे अंतर ठेवून व्यवहार करणे, मीठ किंवा हळद टाकून गरम पाण्याकडे गुळण्या करणे, तुळस व अल्ला वापरून चहा पिणे, तसेच जे बाहेर गावी कामाला गेले आहेत ते गावांमध्ये येण्यापूर्वी त्यांना शेजारील ग्रामिण रुग्णालयात जाऊन व्यवस्थित तपासणी करून घेण्यात यावी, अनोळखी व्यक्ती गावात विनाकारण आल्यास पोलीस पाटलास कळविणे, अशी सूचना केली आहे.
यावेळी नवसंकल्प एकता परिषद महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोये, ग्रामसेवक राजेंद्र खांडवी, मनखेड सोसायटी चे चेअरमन धनराज गावित, सरपंच पुष्पा महाले, ग्रामपंचायत सदस्य हौसाबाई गावित, गुलाब जाधव, किरण पिठे, दीपक गावित आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.






