Maharashtra

खान्देश साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे भव्य स्वातंत्र्य सन्मान काव्य संमेलन

खान्देश साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे भव्य स्वातंत्र्य सन्मान काव्य संमेलन

खान्देश साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे भव्य स्वातंत्र्य सन्मान काव्य संमेलन

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
 खान्देश साहित्य परिषद तर्फे  स्वातंत्र्य सन्मान काव्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष म्हणून डॉ.अनिल कुमार पगारे यांनी पद भूषविले. यावेळी “जीवन आणि जगणं” या ललित लेखांचे प्रकाशन विद्रोही कवी साहेबराव मोरे यांनी यांच्या हस्ते प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, “नवी मध्ये एवढी ताकद असते की तो शब्दातून, लेखणीतून परिवर्तन करू शकतो. “गर्दी पेक्षा दर्दी” हे वाक्य कवींच्या बाबतीत तंतोतंत जुळतात. कवी विषय गुंफून त्या भावना, वेदना प्रकट करतो तेव्हा त्यातून वास्तवता झिरपते. महाराष्ट्रभर कवींना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, असे सांगताना कविता यथोचित मानसन्मान देताना करताना, कवी हा जगताचा धनी आहे असे आवर्जून सांगितले. पुढील वर्षी राज्यस्तरीय संमेलनांचे आयोजन करणार असल्याचे मंगेश चव्हाण म्हणाले. डॉ.अनिल कुमार पगारे यांनी लेखणीचे महत्त्व विशद करताना वेगवेगळे अनुभव सांगून अनेक कवींचा संघर्ष व त्यातून निर्माण साहित्य याविषयी माहिती दिली. विद्रोही कवी तथा खान्देश साहित्य परिषदेचे संस्थापक साहेबराव मोरे यांनी कवींना एकत्र बांधून त्यांच्या विचारांना प्रकट करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध केल्याचे सांगितले.

खान्देश साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे भव्य स्वातंत्र्य सन्मान काव्य संमेलन

यावेळी चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी मंगेश चव्हाण यांचे शीघ्र रेखाटन तयार करून त्यांना भेट केले. यावेळी आयोजकांचाही सत्कार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. प्रास्ताविक साहेबराव मोरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय ललिता पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुनील गायकवाड व गौतम कुमार निकम यांनी केले. यावेळी व्यासपीठावर परिमल ग्रुपचे संस्थापक प्रा.शिवाजी साळुंखे, अभिनेते गझलकार अजय बिरारी, खुशाल पाटील उपस्थित होते. 
कार्यक्रमासाठी जितेंद्र वाघ, प्रदीप देसले, सुनील गायकवाड, खुशाल पाटील, गौतम कुमार निकम, दिनेश चव्हाण, दिनेश राठोड, ललिता पाटील, रमेश पोद्दार यांनी परिश्रम घेतले. प्रथम सत्राचे आभार कवी दिनेश राठोड यांनी मानले तर दुसऱ्या सत्रात भव्य काव्यसंमेलन संपन्न झाले, यात एकूण 72 कवींनी सहभाग घेतला. याचे सूत्रसंचालन संदीप ढाकणे व दत्ता कल्याणकर यांनी केले. या संमेलनात सहा बालकवींनी कविता सादर केल्या, यात देशभक्ती, प्रेम, शेतकरी व्यथा, गरिबी, भूक, आई-बाप, बेटी बचाव, निसर्ग, पाऊस, मृत्यू, जगणं अशा विषयाच्या कविता काही कवींनी गायनातून सादर केल्या.
#स्वातंत्र्य_सन्मान_काव्य_संमेलन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button