अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतर करावे ः राजूमामा तागड
सुनिल नजन/अहमदनगर
ठाकरे सरकारने पाय उतार होताना जाता जाता औरंगाबादचे संभाजी नगर,आणि उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर केले. पण अहमदनगरचे अहिल्यानगर हे नामांतर का केले नाही असा सवाल ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जेष्ठ नेते राजूमामा तागड यांनी एका निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.ठाकरे सरकारने केलेल्या नामांतरावर शिंदे सरकारनेही रेघोट्या ओढत शिक्कामोर्तब केले आहे. आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झालेला आहे. या जिल्ह्याला होळकर शाहीची थोर परंपरा आहे. नगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव द्यावे ही मागणी तशी जुनीच आहे.धनगर समाजाचे नेते भाजपाचे विधान परीषदेतील आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रा.राम शिंदे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात नामांतरासाठी मोठा लढा दिला होता आता भाजप शिंदेसेनेचे सरकार आहे त्यांनी हा नामांतराचा प्रश्न त्वरित निकाली काढून महाराष्ट्रातील दोनकोटी धनगर समाजाची अस्मिता जपावी.आणि अहमदनगर जिल्ह्याचे भाग्यविधाते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अहिल्यानगर नामांतर प्रश्नावर लक्ष घालून विधानसभेत ठराव मंजूर करून घेण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करावेत अशी मागणी राजूमामा तागड यांनी एका प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे.धनगर समाजाला २०१९ साली लागू केलेल्या सवलती पुन्हा सुरू केल्यामुळे शिंदे सरकारचे अभिनंदन केले आहे.







बिना काना मात्रा असवारी एक मेव अहमदनगर ची ओळक आहे जगातील एक आश्चर्य महाराष्ट्राची शान आहे . अहिल्या देवी होळकर यांचा जन्म ज्या गावी झाला. त्याच गावाचे नाव बदलावे म्हणजे जन्माचे ठिकान कळेल किंवा त्यांचा जन्म ज्या तालुक्यात झाला त्याच तालुक्याचे नाव बदलावे म्हणजे जन्माचे ठिकान कळेल अहमदनगर ही खुप पावन भूमि आहे. इथे शनी शिंगनापुर आहे . इथे शिर्डी आहे. इथे खंडोबाची सासरवाडी आहे. इथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. अनेक थोर पुरुषांची जन्मभुमी पण आहे सर्वाचा आदर करावा. महापुरुषांनी म्हंटले आहे की मानवता हाथ खरा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाला समानतेची वागनुक मिळावी जाती पाती मानु नये. सर्व समाज शिकला आहे सुधार ना झाली आहे त्यामुळे समान नागरि कायदा करावा ही विनंती