निलंगा तालुक्यातील शिडोळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून पिडीतेला न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा भिम आर्मीचा इशारा
लक्ष्मण कांबळे लातूर
निलंगा : ६ एप्रिल २०२१ रोजी शिडोळ गावातील इसमाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट चे आमिष दाखवून अत्याचार करून फरार झालेल्या इसमास तात्काळ अटक करून पीडितेला न्याय देण्यात यावे म्हणून आज दिनांक ९एप्रिल २०२१ रोजी भिम आर्मीच्या वतीने पीडित कुटूंबाची भेट घेऊन पीडित मुलीची निलंगा येथील सरकारी दवाखान्यात जाऊन तिच्या प्रकृतीची चौकशी करून भिम आर्मी न्याय मिळेपर्यंत आपल्या सोबत असेल असे भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली व अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक पीडितेला न्याय देण्यात यावे म्हणून निलंगा येथील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले, या वेळी भिम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव मा अशोकभाऊ कांबळे, महाराष्ट्र राज्याचे महासचिव डॉ किर्तीपाल गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे, लातुर जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे, जिल्हा संघटक सुभाष बनसोडे, लातुर शहर प्रमुख बाबा ढगे, तसेच निलंगा तालुका अध्यक्ष नितीन कांबळे ,रितेश गायकवाड, सुशील शिंदे, आदी भिम हजर होते ,






