Pandharpur

पंढरीच्या अनिल नगर मध्ये वाळू माफियांवर कारवाई

पंढरीच्या अनिल नगर मध्ये वाळू माफियांवर कारवाई

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमधील अनिलनगर येथून काही इसम गाढवावरुन वाळू वाहत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांना मिळाली असता पोलीस नाईक संदिप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे, हुलजंती, तडवी, मुजावर अनिलनगरला येत असता चंद्रभागा नदीपात्राकडून वाळूने भरलेली पोती पाठीवर घेवून दहा गाढवे मांडव खडकी येथऊन येत असल्याची दिसली. गाढवांच्या पाठीमागून एक इसम चालत येत असल्याचे दिसले. त्या इसमाच्या जवळ पोलीस जाताच तो इसम चंद्रभागा नदीपात्राकडे पळून गेला. याबाबत आजुबाजुला त्या इसमाबद्दल चौकशी केली असता याबद्दल माहिती समजली नाही. त्याने चंद्रभागा नदी पात्रातून ४० पाट्या वाळू विनापरवाना चोरुन दहा पोत्यात भरुन गाढवावर लादलेल्या वाळू व साहित्य तपासून पाहता २००० रुपये किमतीची वाळू दहा पोत्यामध्ये ४० पाट्या असलेली तसेच २०० रुपये त्यात दोन प्लास्टीकच्या पाट्या व दोन खोरे जुने वापरलेले २२०० रुपये किमत असलेली असे साहित्य पोलिसांना मिळाले.

१५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मांडव खडकी अनिलनगर येथे विशाल नेमाडे व संतोष जाधव दोघे रा.अनिलनगर पंढरपूर व एका अज्ञात इसमाविरुध्द दहा गाढवांवर ४० पाट्या वाळू त्याची किंमत २००० रुपये किमतीची शासनाने संमतीशिवाय विनापरवाना चोरुन घेवून जात असताना सदर इसम पळून गेले म्हणून त्याच्याविरुध्द भा.द.वि. कलम ३७९,३४ व गौण खनिज कायदा कलम ४(१), ४(क) १), २१ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button