Jalgaon

Jalgaon Live: चाकुचा धाक दाखवून महाविद्यालययीन तरुणीवर बलात्कार..!

Jalgaon Live: चाकुचा धाक दाखवून महाविद्यालययीन तरुणीवर बलात्कार..!

जळगाव : चाकूचा धाक दाखवून २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. विनोद सुकलाल भोळे ,रा. सदोबा नगर, जळगाव याच्याविरुद्ध मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. १ सप्टेबर रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पंधरा दिवसापूर्वीच आईचे आजारपणामुळे निधन झाले. वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले तर पीडिता एकटीच घरी होती. विनोद भोळे याच्याशी पीडित कुटुंबाचे घरोब्याचे संबंध असल्याने येणंजाणं सुरु होते. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते.
पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता.त्यामुळे १ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता भोळे हा पीडितेच्या घरी गेला. दरवाजा उघडायला लावला.
घरात आल्यावर चाकूचा धाक दाखवून बाहेर निर्मनुष्यस्थळी घेऊन गेला. तेथे अंधार असल्याने तेथून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. घरात दोन वेळा त्याने पीडितेवर अत्याचार केला.त्यानंतर एक तासाने तरुणीची सुटका केली. यावेळी त्याने डाव्या हातावर चाकू मारल्याने दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीने मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button