इंदापूर

महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती वाफगाव ता.खेड जि.पुणे जन्मगावी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साजरी करणार -विश्वासराव देवकाते उर्फ नाना पाटील ,अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे

महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती वाफगाव ता.खेड जि.पुणे जन्मगावी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साजरी करणार -विश्वासराव देवकाते उर्फ नाना पाटील ,अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे

दत्ताजी पारेकर

ज्या पद्धतीने राष्ट्रपुरुष मल्हारराव होळकर यांची जयंती सातारा जिल्हापरिषदेच्या व शासनाच्या माध्यमातून जरवर्षी जन्मगावी होळमुरूम ता. फलटण जि.सातारा येथे सालाबादप्रमाणे होत असते. त्याचप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती इथूनपुढे पुणे जिल्हापरिषदेच्या व शासनाच्या माध्यमातून करण्यासंदर्भात दि.16/12/2019 जिल्हापरिषद
पुणे येथे बैठक पार पडली .
गेल्या अनेक दिवसापासून यासंदर्भात महाराजांचे जन्मगाव वाफगावचे उद्योजक धनंजय भागवत सरपंच व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व गोविंद देवकाते व प्रकाश खाडे यांचा पाठपुरावा चालू होता.
या सामाजिककार्याला यश आले आहे या कामासाठी मा.भूषणराजे होळकर ,अमितराजे होळकर, संजय सोनवणीेसर ,डॉ .उज्वला हाके, माणिकराव चोरमले, पप्पूराजे होळकर ,किरण सोनवलकर, विक्रांत काळे, खरातसाहेब, बाबासाहेब बिडगर जयश्रीताई धायगुडे यानीं यासंदर्भात विशेष पाठपुरावा केला??
??

Leave a Reply

Back to top button