फैजपूर

धनाजी नाना महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

सलीम पिंजारी

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय स्किल सेंटर आणि कन्हैया कम्प्युटर्स, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धातील बक्षीस वितरण वितरण समारंभ साठी प्रसिद्ध लेखक माननीय प्रा वसंत पुरुषोत्तम होले यांना आमंत्रित करण्यात आले यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी हे होते यावेळी माननीय प्रा व पु होले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मोबाईलचा वापर विधायक करावा ज्या प्रमाणे मोबाईल वापराचे फायदे आहेत त्याचप्रमाणे अनेक तोटेही आहेत त्यामुळे महाविद्यालयीन जीवन जगताना ध्येयाकडे वाटचाल करावी आणि प्रचंड मेहनतीने इप्सित साध्य करावे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौधरी यांनी महाविद्यालय आणि स्कील सेंटर च्या वतीने उपलब्ध सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांनी विधायक वापर करावा असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्किल सेंटर च्या संचालिका सौ दिपाली महाजन व श्री मिलन महाजन यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button