रावेर

फैजपूर येथे काँग्रेसचे शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेस चा मेळावा आयोजित…

फैजपूर येथे काँग्रेसचे
शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेस चा मेळावा आयोजित…

विलास ताठे

रावेर विधानसभा युवक काँग्रेस चा भव्य मेळावा गुरुवार दि.17/10/2019 रोजी होणार आहे. या मेळाव्यात हजारो च्या संख्येने युवक उपस्थित राहणार आहेत व शेकडो युवक प्रवेश घेणार आहेत. या मेळाव्यात रावेर विधानसभा काँग्रेस चे अधिकृत उमेदवार मा. शिरीषदादा चौधरी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील मतदार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विधानसभेतील मतदान जनजागृती मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहे.

तरी रावेर व यावल तालुक्यातील सर्व युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुरुवारी वेळेवर न चुकता आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केले.

स्थळ: महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल, म्युनसिपल हायस्कूल के बाजूने, फैजपुर

वेळ: 17/10/2019 गुरुवार दुपारी 3 वाजता
असे
प्रा. हितेश सुभाष पाटील
जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, जळगाव यांनी कळविले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button