प्लास्टिक मुक्तीसाठी प्रबोधनपर रॅली
राहुल खरात
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी, राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र सांगली विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम संपन्न झाला.प्राध्यापक सदाशिव मोरे यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती दिली.व प्रा.विजय शिंदे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्लास्टिक चा वापर टाळा, व उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
” स्वच्छता ही सेवा ” या अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानांस प्रतिसाद म्हणून ,राष्ट्रीय सेवा योजना विभातील 152 स्वयंसेवक व नेहरू युवा केंद्र सांगली ,च्या काही स्वयंसेवकांनी व प्राध्यापकांनी महाविद्यालय परिसर ते ग्रामपंचाय , बाजार पटांगण ते मुख्य पेठ ते बस स्थानक परिसरातील सर्व प्लास्टिक गोळा केले.ग्रामपंचायतचे
सरपंच ,उप सरपंच व ग्रामसेवक, यांच्याकडे दिले ग्रामपंचायत समोर सर्वांना प्लास्टिक न वापरण्याची शपथ देण्यात आली.
ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर देऊन सहकार्य केले या उपक्रमास प्राचार्य डॉ. विजय लोंढे,
प्रा.सदाशिव मोरे समन्वयक सांगली जिल्हा , प्रा.गणपतराव नांगरे,डॉ.धनंजय लोहार ,कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय हजारे,डॉ. किशोर जाधव,डॉ.शिवाजी विभूते,प्रा.विलास सुर्वे, प्रा.प्रभाकर जाधव,डॉ.अंकुश कोळेकर,प्रा.शंकर पवार,प्रा. हणमंत सावंत, प्रा.विजय शिंदे,नेहरू युवा केंद्र आटपाडी ,तालुका प्रतिनिधी राहुल नवले, व अभय देशमुख इ.उपस्थित होते






