यावल ला काँग्रेसतर्फे केन्द्र शासनाच्या सैन्यदलातील अग्निपथ या योजनेचा जाहीर निषेध
यावल ( शब्बीर खान)
केन्द्रातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनाने आणलेल्या अग्निपथ या योजनेचा धिकार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येवुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . केन्द्रातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रीयेत बदल करून भारतीय जनता पक्षाच्या शासनाने नुकतीच अग्निपथ ही योजना जाहीर केली आहे . या गोंधळलेल्या योजनेमुळे देशातील तरुणांचे भावित्वय धोक्यात आले आहे .केन्द्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाले आहे . या अग्निपथ योजनेच्या विरोधात मोठया प्रमाणावर आंदोलन होत आहे . जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पवार , यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्या सुचने वरुन काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तहसील कार्यालयासमोर या अग्निपथ या योजनेच्या विरोधात आंदोलन करीत केन्द्र शासनाचा घोषणा करीत जाहीर निषेध करण्यात आले व यावलचे तहसीलचे तहसीदार महेश पवार यांना लिखित निवेदन देण्यात आले , या आंदोलनात संगोयोचे तालुका अध्यक्ष शेखर पाटील , माजी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , कॉंग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल ,कोरपावली सरपंच विलास अडकमोल , माजी नगरसेवक शेख अस्लम नबी , मनोहर सोनवणे , कालु मास्टर , गुलाम रसुल गुलाम दस्तगीर, तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, महाराष्ट्र सरपंच परिषदचे तालुका उपाध्यक्ष तथा मारूळचे सरपंच असद जावेद अली काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, भोजराज पाटील , भुषण राणे , धिरज पाटील ,नईम शेख , आनंद मेघे, पुंडलीक बारी , श्रीमती चंद्रकलाताई इंगळे , नरेन्द्र ससाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले .






