पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी श्री दत्ताजीराव पाटील यांची बिनविरोध निवड.
प्रतिनिधी
रफिक आतार
पंढरपूर महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी सा. सत्यता चे संपादक श्री दत्ताजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली .रविवारी सकाळी११वा. श्री संत दामाजी मठ येथे पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली, यावेळी ही बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी दिनेश खंडेलवाल,उपाध्यक्षपदी विजय कांबळे,सचिवपदी विश्वास पाटील,सहसचिवपदी रफिक आतार,खजिनदार बाहुबली जैन,प्रसिद्धीप्रमुख चैतन्य उत्पात, संघटक सौ सुरेखा भालेराव,शहर संपर्क प्रमुख कबीर देवकुळे,शहर समन्वयक प्रकाश इंगोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे,तालुकाध्यक्ष प्रशांत माळवदे, चैतन्य उत्पात, रवींद्र शेवडे,विश्वास पाटील,विनोद पोतदार,संजय यादव,राजेंद्र काळे,अमर कांबळे,बाहुबली जैन,कबीर देवकुळे, सचिन कुलकर्णी, सूर्याजी भोसले,दत्तात्रय देशमुख, विजय कांबळे,दिनेश खंडेलवाल,रफिक आतार,गोरख गायकवाड,राजेंद्र नागटीळक,सुरेखा भालेराव,प्रकाश इंगोले सुहास माळी व देवमारे आदी मान्यवर पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन शहराध्यक्ष दत्ता पाटील म्हणाले,सर्वांना बरोबर घेऊन,सगळ्यांच्या विचाराने संघटनेचे कार्य केले जाईल,शहर तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांवर होणारे अन्याय,दुजाभाव यावर ,पत्रकारांवर होणारे हल्ले,अशा चुकीच्या गोष्टींना विरोध करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल,जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे म्हणाले,पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,भविष्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील, सर्वांनी एकत्र येऊन काम करावे,किरकोळ मतभेद सर्वत्र असतात,पण आपले मत मांडावे,याचा विचार केला जाईल,यावेळी उपाध्यक्ष विजय कांबळे, रवींद्र शेवडे,विनोद पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले.






