Yawal

यावल नगरपालिका स्तरिय समितीवर सदस्यपदी महाविकास आघाडीचे अनिल जंजाळे , जगदीश कवडीवाले व अमोल भिरूड यांची निवड

यावल नगरपालिका स्तरिय समितीवर सदस्यपदी महाविकास आघाडीचे अनिल जंजाळे , जगदीश कवडीवाले व अमोल भिरूड यांची निवड

यावल शब्बीर खान

युवा सामाजीक कार्यकर्त अनिल जंजाळे व अमोल भिरूड यांची आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालीका स्तरिय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे . राज्य शासनाच्या नियमानुसार जळगाव जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी यावल नगरपालिका स्तरिय समिती जाहीर केली आहे . यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालीका स्तरिय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांची पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या शिफारशी वरून अशासकीय सदस्यपदी अनिल निळ्कंठ जंजाळे , सामाजीक कार्यकर्ता व खरेदी विक्री सहकारी संघाचे संचालक अमोल सुर्यकांत भिरूड, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश रत्नाकर कवडीवाले , निलेश काशिनाथ बेलदार ,यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीचे राष्ट्रवादीचे तालुका प्रा . मुकेश येवले , कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी या निवडीचे स्वागत केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button