Pandharpur

एस. टी. कर्मचाऱ्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यासाठी श्री विठ्ठल ला अभिषेक करून मनसेचे साकडे ,,,मनसे नेते दिलीपबापू धोत्रे

एस. टी. कर्मचाऱ्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यासाठी श्री विठ्ठल ला अभिषेक करून मनसेचे साकडे ,,,मनसे नेते दिलीपबापू धोत्रे

प्रतिनिधी
रफिक आतार

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व एस. टी.कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप, उपोषण ,जागरण आंदोलन चालू आहे,, चाळीस पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी देखील सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही,,
या झोपलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथे श्री विठ्ठल भगवंताचा अभिषेक करून या झोपलेल्या सरकारला सुबुद्धी द्यावि यासाठी साकडे घातले,,पंढरपूर येथील नामदेव पायरीजवळ मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला,
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुनभाऊ कोळी, मनसे चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, समाजसेवक संतोष कवडे, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, गणेश पिंपळणेरकर, सुमित शिंदे, दाजी शिंदे, महादेव मांढरे, शुभम काकडे
,सर्व एस, टी, कर्मचारी उपस्थित होते,,
यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की राज्य सरकार जाणून बुजून कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे, आंदोलन चिरडण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत आहे हे त्वरित थांबवावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,,
शासनाने सर्व एस, टी, कर्मचाऱ्यांना त्वरित शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावे ,ही सुबुद्धी राज्य सरकारला द्यावी यासाठी आज विठ्ठलाला अभिषेक करून साकडे घातले, तसेच जागरण गोधळ आंदोलन करण्यात आले,,
यावेळी कोळी महासंघाने आंदोलनाला पाठिंबा देऊनकामगारांना धीर दिला, शासनाने जर कर्मचाऱ्यांवर अन्याय केला तर कोळी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोळी महासंघाचे राज्य उपअध्यक्ष अरुंभाऊ कोळी यांनी दिला,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button