बेगमपुर येथे शुभारंभ अर्बन संस्थेचा स्थलांतर व उद्घाटन सोहळा संपन्न
प्रतिनिधी
रफिक आतार
काल दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील शुभारंभ अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेचा स्थलांतर वा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नागेश दादा फाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले , यावेळी जि. प. सदस्या शैलाताई गोडसे , शिवसेना तालुका प्रमुख अशोक काका भोसले , संस्थेचे मार्गदर्शक भारत नाना माने , बळीराजा पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण बापू माने , लोकराजा पतसंस्थेचे मार्गदर्शक तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर धनंजय गोडसे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे सदस्य प्रमोद बाबर, आरटीओ इन्स्पेक्टर सातारा प्रसाद सुरवसे, बेगमपूर चे उद्योजक दत्ता चव्हाण , भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर प्रथम शिवप्रतीमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवरांसहित उत्कृष्ट ठेवीदार व कर्जदार यांचे सत्कार करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर संस्थेचे चेअरमन श्री गणेश सुर्यवंशी यांनी प्रास्तविक आणि आपले विचार व्यक्त केले संस्थेने अल्पावधीत केलेली प्रगती त्याचा संपूर्ण लेखाजोखा , ताळेबंद सर्व सभासदांसमोर सादर केला त्यामध्ये संस्थेची आत्तापर्यंतची प्रगती आलेल्या अडचणी इत्यादी माहिती दिली त्याच सोबत शुभारंभ अर्बन संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस संदर्भात त्यांनी माहिती दिली.तसेच जास्तीत जास्त सभासदांनी आपल्या ठेवी शुभारंभ अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड मध्ये ठेवाव्यात असे आवाहन केले .त्यानंतर बळीराजा पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण बापू माने यांनी आपले मोलाचे असे मार्गदर्शन केले , त्यांच्या वीस वर्षाचा अनुभव आणि आलेल्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्था चालवत असताना कोणती काळजी घ्यावी संस्थेत आलेल्या ग्राहकांना कशी वागणूक द्यावी तसेच अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण द्या व याबद्दल त्यांनी माहिती दिली.
त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर धनंजय गोडसे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले ते करत असताना त्यांनी आपल्या लोकराजा पतसंस्थे विषयी माहिती दिली . त्याच सोबत शुभारंभ अर्बन मध्ये ठेव देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आणि संस्थेच्या अडीअडचणी मध्ये सोबत राहण्याचे बहुमोल असे मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे नागेश दादा फाटे यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या इतर ठिकाणी शाखा काढण्यासाठी सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले . तसेच इतर कोणत्याही अडीअडचणी मध्ये संस्थेला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .त्यानंतर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक निलेश सुर्यवंशी यांनी व्यक्त केले .यावेळी नारायण आप्पा सुरवसे, संस्थेचे संचालक अक्षय सुरवसे ,आनंद सुरवसे ,महेश सूर्यवंशी, हनुमंत बापू सुरवसे, शाहू तात्या सुरवसे, माणिक दाजी सुरवसे , सुरेश सुरवसे , प्रद्याकांत सुरवसे , महेश सुरवसे. इ मान्यवर तसेच संस्थेचे कर्मचारी प्रवीण पाटील , लहू पवार , बालाजी सुरवसे उपस्थित होते .






